नागपूरात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला

आतापर्यंत २०८६ नागरिकांना बाधा
Corona-patient
Corona-patientSakal media

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट(third wave of corona) आता वेगाने पसरत असून गुरूवारी एकाच दिवशी जिल्ह्यात २०८६ रुग्ण आढळले. यामध्ये शहरातील १५८९ नागरिकांचा समावेश आहे. तसेच एका सत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. एकीकडे कोरोनाचे बाधित वाढत असताना नागरिकांनी कोविड नियमांचे (covid rules)पालन करणे सोडून दिल्याचे चित्र शहरभर पहायला मिळत आहे.

Corona-patient
कोल्हापूर : देशी चुना नामशेष होण्याच्या मार्गावर

गेल्या १३ दिवसांमध्ये जिल्ह्यात ८ हजार ८५६ कोरोनाबाधित(covid positive) आढळले. तिसऱ्या लाटेत संक्रमण वेगात होत असले तरी मृत्यू नियंत्रणात असल्याने प्रशासनाला सध्या तरी दिलासा मिळालेला आहे. पण कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अल्प असल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे. गुरूवारी जिल्ह्यात १३ हजार ६९३ चाचण्या केल्या. त्यापैकी २ हजार ०८६ अहवाल बाधित आले. यामध्ये शहरातील २०८६, ग्रामीणमधील ४२४ तर जिल्ह्याबाहेरील ६३ जणांचा समावेश आहे. पहिल्या दोन आणि सध्या सुरू असलेल्या तिन्ही लाटांमध्ये जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ५ लाखांवर नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. तसेच पावणेपाच लाख नागरिकांनी कोरोनावर मातही केली आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या ७ हजार ३०३ वर पोहचली आहे.

Corona-patient
इचलकरंजी : वीजदर सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीबाबत मुदतवाढ नाही

१७ पोलिसही बाधित

कोरोनाचा(corona) फटका पोलिस दलालाही बसत आहे. गुरूवारी १७ पोलिसांना लागण झाली असून आतापर्यंत ६५ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे.(17 police covid positive)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com