
भारतीय रेल्वेकडून नियमित रेल्वेगाड्यांशिवाय काही विशेष गाड्याही चालवण्यात येतात. सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही ट्रेन्सना प्रचंड प्रतिसाद मिळतो. रक्षाबंधन आणि गणेशोत्सव कालावधीत अशाच काही रेल्वे गाड्यांची घोषणा रेल्वेकडून करण्यात आलीय. दरम्यान, रक्षाबंधन निमित्त विशेष ट्रेन उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसून आलंय. मध्य रेल्वेनं मुंबई-नागपूर अशी विशेष ट्रेन जाहीर केली होती. पण मध्य रात्री साडे बाराच्या सुमारास सुटणारी गाडी सकाळी सहा वाजले तरी सीएसएमटी स्टेशनला न आल्यानं प्रवाशांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती.