Nagpur Fraud
esakal
नागपूर: शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी महामेट्रोच्या निवासी अभियंत्याची २२ लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तीन सायबर गुन्हेगारांविरूद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा व फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. वसीम राजा मोहम्मद इशाक (वय ४२ रा. ड्रिम आवास, बेलतरोडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.