Breaking News : नागपुरात मृतांचा आकडा शंभरीकडे, ग्रामीणमध्ये वाढतोय कोरोना 

The death toll in Nagpur is over a hundred
The death toll in Nagpur is over a hundred
Updated on

नागपूर :  सोमवारी नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा 274 हा उच्चांकी आकडा नोंदविला गेला. तसेच एकाच सर्वाधिक दहा मृत्यूंची नोंदही सोमवारी झाली. मंगळवारी आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्याने नागपूर जिल्ह्यात मृतांची संख्या 97 वर पोहोचली. तर 50 बाधित आढळले. जुलै महिन्यात सर्वाधिक मृत्यू झाले असून, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाने हातपाय पसरल्याने बाधितांची संख्या जलदगतीने वाढत आहे. तसेच मृतांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येते.  

नागपुरातील मेयो आणि मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित उपचारासाठी दाखल असून यातील दहा जणांचा बळी सोमवारी गेला. यात मेयो रुग्णालयात चार तर मेडिकलमध्ये दोन मृत्यू झाल्याचे उघड झाले. मेयोतील मृतांमध्ये काटोल रोड येथील पेन्शनगर, नेनरू कॉलनीतील 74 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. 22 जुलै रोजी मेयोत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेहासह न्युमोनिया झाला होता. यामुळे श्‍वसन यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आला. त्यांना श्‍वास घेणे कठीण झाल्याने कृत्रिम श्‍वास देण्यात आला. मात्र, सोमवारी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.

महाल नाईकरोड येथील 69 वर्षीय व्यक्तीला 24 जुलै रोजी मेयोत दाखल केले. त्यांना कोरोना झाल्याचे उघड झाले. अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मधुमेह होता. श्‍वसन यंत्रणा निकामी झाली होती. त्यांचा मृत्यू झाला. हिंगणा डिगडोह येथील 50 वर्षीय व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. परंतु, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल उशिरा आल्याने त्यांच्या मृत्यूची नोंद सोमवारी करण्यात आली. 

उत्तर नागपुरातील लष्करीबाग किडवाई मैदाजवळचे रहिवासी असलेल्या 43 वर्षीय महिलेचा मेयोत दुपारी साडेतीन वाजता मृत्यू झाला. त्यांना उच्चरक्तदाबासह इतरही आजार होते. त्यात कोरोनाची बाधा झाल्याने फुफ्फुसावर ताण आला. श्‍वसन यंत्रणाच निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मेडिकलमध्येही सहा मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यात बैद्यनाथ चौक येथील 50 वर्षीय व्यक्तीला 24 जुलैरोजी मेडिकलमध्ये दाखल केले. कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आला आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. उच्च रक्तदाब होता. कोरोनाची लागण झाल्याने फुफ्फुसासह यकृतावरही परिणाम झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

आग्याराम देवी चौकातील 63 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. सात दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कोरोनावर मात करता आले नाही. बाबा ताजाबाग येथील 57 वर्षीय महिलेचा मृत्यू रविवारी झाला. मात्र, या मृत्यूची नोंद सोमवारी करण्यात आली. त्यांनाही रक्तदाबासह न्युमोनिया होता. महादुला येथील 45 वर्षीय युवकाचा पहाटे सोमवारी साडेसहा वाजता निधन झाले. अनमोल नगर येथील 63 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी मेडिकलमध्ये मृत्यू झाला. 

25 जुलै रोजी त्यांचा अहवाल आला आणि लगेच एक दिवसाच्या उपचारानंतर त्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. उत्तर नागपुरातील कमाल चौक येथील 44 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांना दमा होता. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या श्‍वसनयंत्रणेवर विपरित परिणाम झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

शहरात सर्वाधिक 56 मृत्यू

नागपूर जिल्ह्यात आजवर 4,336 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1,157 खेड्यातील रुग्ण आहेत. मेयो, मेडिकलसह कोविड सेटंरमध्ये 1,665 बाधितांवर उपचार सुरू आहे. शहरात 913 सक्रिय कोरोनाबाधित आहेत तर नागपूर ग्रामीणमध्ये 752 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला तर शहरात आतापर्यंत कोरोनाचे 56 मृत्यू झाला आहे. नागपूर बाहेरचे 21 मृत्यू आहेत. 

कामगार रुग्णालयातील कर्मचारी निगेटिव्ह

कामगार रुग्णालयातील परिचारिकेला कोरोना झाल्याची माहिती पुढे आली. यानंतर लगेच कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांनी परिचारिकेच्या संपर्कातील सहा ते सात कर्मचाऱ्यांची चाचणी केली. सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. आतापर्यंत कोरोनापासून दूर असलेल्या या रुग्णालयातील उपचार यंत्रणा मात्र सुरू आहे, असे डॉ. देशमुख म्हणाल्या. 

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com