शवविच्छेदनामुळे बेवारस शवांच्या देहदानात घट | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : शवविच्छेदनामुळे बेवारस शवांच्या देहदानात घट

नागपूर : शवविच्छेदनामुळे बेवारस शवांच्या देहदानात घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयच्या(मेडिकल)विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्र विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी मृतदेहाची गरज असते. ही गरज अल्प देहदानातून पुर्ण होत नाही. बेवारस मृतदेह मेडिकलच्या विद्यार्थ्याच्या प्रात्याक्षिक अभ्यासाची गरज पुर्ण करतात. मात्र अलिकडे बेवारस मृतदेहांचे शवविच्छेदन होत असल्याने देहदानाचा टक्का घसरला आहे.

मेडिकलमध्ये दशकापूर्वी चार वर्षांत ३५ जणांचे देहदान झाले होते. तर ४८ बेवारस मृतेदह रस्त्यावर सापडले होते. या बेवारस मृतदेहांमुळे विदर्भातील वैद्यकीय शिक्षणाची गरज भागत होती. मात्र, बेवारस मृतदेह कमी होत असताना देहदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण होत आहे. यामुळे देहदानाचा टक्का वाढला आहे. बेवारस मृतदेहाच्या देहदानाचे प्रमाण ७५ टक्यापेक्षा अधिक होते. उर्वरित नातेवाईकांकडून झालेले देहदान अवघे २५ टक्के होते. मागील चार वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास बेवारस मृतदेहाच्या देहदानाचा टक्का ७ टक्के आहे. तर सामान्य देहदान ९२ टक्के झाले आहे. कोरोनाचा फटका देहदानाला बसला आहे.

हेही वाचा: अकोला : दोन चोरट्यांनी केली नऊ ठिकाणी घरफोडी

देहदान- श्रेष्ठदानसह इतर जिवंत मानसासह मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानसह इतर विषयांवरील जनजागृतीवर शासन प्रत्येक वर्षी कोट्यावधींचा खर्च करते. परंतु, कोरोनामुळे या देहदानासह अवयवदानाला खिळ बसली आहे. २०१८ मध्ये मेडिकलमध्ये २७ जणांचे देहदान झाले. २०१९ मध्ये देहदान वाढले असून ही संख्या ३६ वर गेली. पण २०२० मध्ये देहदानाची संख्या २२ होती. २०२१ मध्ये ऑक्टोंबरपर्यंत केवळ १० देहदान झाले आहेत. मागील चार वर्षांत मेडिकलमध्ये २०१८ ते ऑक्टोंबर २०२१ दरम्यान ९५ देहदान झाले. त्यात ८८ देहदान सामान्य संवर्गातील होते. तर ७ देहदान बेवारस मृतदेहाचे होते. मेडिकलमधून गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळसह इतरही वैद्याकीय महाविद्याालयात विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी मागणीनुसार मृतदेह उपलब्ध करून दिले जातात.

"कोरोनामुळे मेडिकलमध्ये सर्व डॉक्टर कोरोनाच्या युद्धात सामान्यांचा जीव वाचवण्यासाठी लढत होते. सद्या कोरोना नियंत्रणात आहे. यामुळे देहदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. मेडिकल प्रशासन देहदानाला चळवळीचे रूप देण्यासाठी प्रयत्नशील आहे."

- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल , नागपूर

loading image
go to top