esakal | वाढत्या अपघातांना ब्रेक लावा अन्यथा टोकाचे पाऊल उचलू; भारतीय जनता युवा मोर्चाचा ईशारा
sakal

बोलून बातमी शोधा

decrease the number of accident in Nagpur seek Youth BJP

यावर अंकुश म्हणून प्रशासनाने जलालखेडा आणि भारसिंगी येथे तात्काळ स्पीड ब्रेकर लावावे ज्यामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागणार नाही अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा ने तहसीलदारांना मागील महिन्याच्या ५/११/२०२० च्या निवेदनातून केली होती

वाढत्या अपघातांना ब्रेक लावा अन्यथा टोकाचे पाऊल उचलू; भारतीय जनता युवा मोर्चाचा ईशारा

sakal_logo
By
अतुल दंढारे

मेंढला (जि. नागपूर) :  भारसिंगी ते जलालखेडा येथील वाहतूक यंत्रणा कोडमडली आहे तसेच वाहतुकीवर अंकुश नसल्यामुळे अंधाधुंद वाहने चालवणाऱ्या चालकांमुळे भारसिंगी जलालखेडा रोड वरील अपघातांचे प्रमाण वाढेल आहे. यात गावातील होतकरू तरुणांना जीव गमवावा लागला आहे, वाहनचालक वर्दळीच्या ठिकाणाहून बेभान वाहने चालवताना दिसून येतात..

यावर अंकुश म्हणून प्रशासनाने जलालखेडा आणि भारसिंगी येथे तात्काळ स्पीड ब्रेकर लावावे ज्यामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागणार नाही अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा ने तहसीलदारांना मागील महिन्याच्या ५/११/२०२० च्या निवेदनातून केली होती. यावर आजपर्यंत कोणत्याच प्रकारची दखल घेतली गेली नाही. 

अधिक वाचा - विवाहिता प्रसूतीसाठी माहेरी आली अन् दीड महिन्याच्या चिमुकल्याला गमावून बसली; भर दुपारी अपहरण

अजनू किती दिवस असाच निष्पाप लोकांचा जीव जाईल,आणि प्रशासनाला जाग येईल..येत्या काळात स्पीड ब्रेकर लावले गेले नाही तर आम्हाला टोकाचे पाऊल उचलावे लागेल असा सज्जड इशारा भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हाउपाध्यक्ष मयूर दंढारे यांनी दिला आहे.

नागपूर काटोल जलालखेडा-वरुड अमरावती मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरणं करण्यात आल्याने या मार्गावर धावणाऱ्या वाहनांचा वेग वाढला आहे.त्यामुळे भारसिंगी , जलालखेडा येथे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्याला ब्रेक लावण्यासाठी या मार्गावर गतिरोधक तयार करणें आवश्यक आहे. हा मार्ग जलालखेडा , भारसिंगी मध्य भागातून गेला हे गावे 30 ते 40 गावाचे केंद्र स्थान आहे.

येथूनच तहसील कडे जाण्याचा मार्ग असून तेथील बाजारपेठ या मार्गाच्या दुतर्फा आहे याचं मार्गालगत बसस्थानक, बँक काही शासकीय कार्यालये, सभागृह,पोलीस ठाणे, असल्याने नागरिकांना वरदळ असते.वाहनांच्या सुसाट वेगामुळे महिनाभरपूर्वी तीन ते चार अपघात झाले आणि त्यात जलालखेडा येथील दोघा होतकरू तरुणांचा मुत्यु झाला.

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गावर वाहनचालक त्यांच्या वाहनांचा वेग कमी करण्यात तयार नसल्याने वाहनांचा वेग अपगाताच्या पथ्यावर पडत आहे, असेच अपघात वरुड येथे होत असलेले पाहून आमदार देवेंद्रभाऊ भुयार यांनी तात्काळ दखल घेऊन वरुड येथे देखील गतिरोधक लावले,त्याच धर्तीवर जलालखेडा भारसिंगी येथे स्पीड ब्रेकर लावावे अशी मागणी दिवाळी आधी माननीय तहसीलदार नरखेड साहेब यांच्याकडे भाजपा युवा मोर्चा व श्रीराम युवा सेने यांच्या मार्फत करण्यात आले.


संपादन - अथर्व महांकाळ

loading image