esakal | नागपूर : डेंगीने हादरला जिल्हा; शहरात ६१७ तर ग्रामीणमध्ये ७९० रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue

नागपूर : डेंगीने हादरला जिल्हा; शहरात ६१७ तर ग्रामीणमध्ये ७९० रुग्ण

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : नागपूरसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत डेंगीचा प्रकोप थांबता थांबेना. त्यात नागपूर जिल्ह्यात प्रत्येकाच्या घरी डेंगीचे रुग्ण आढळून येत आहे. उद्रेकाने नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील ८ दिवसांत सहा जिल्ह्यांमध्ये ५४० डेंगीचे रुग्ण आढळले. यात एकट्या नागपूर जिल्ह्यात जिल्ह्यातील ३४० डेंगीचे रुग्ण आहेत. यामुळे जिल्ह्यात अवघ्या ८ महिन्यात १,४०७ वर पोहोचली आहे. यामुळे पुन्हा एकदा आरोग्याची लक्तरे वेशीवर टांगल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली. म्युकरमायकोसीसवर नियंत्रण आले. मात्र, अचानक पूर्व विदर्भात डेंगीचा उद्रेक झाला. नुकतेच मेडिकलमध्ये ८३० डेंगीग्रस्त आढळले. यातील ३ जणांचा मृत्यू झाला. येथील नोंद अद्याप आरोग्य विभागात झाली नाही. यामुळे पूर्व विदर्भातील मृत्यूचा आकडा अद्यापही ९ वर आहे. डेंगी नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या महापालिकेकडून अद्यापही डेंगीवरील उपचाराचे नियोजन करण्यात आले नाही.

हेही वाचा: चंद्रपूर : जादूटोणाच्या संशयावरून आणखी तिघांना मारहाण

आरोग्य विभागाकडून सर्वत्र फवारणी सुरू आहे. डेंगी नियंत्रणाचा दावा दावा आरोग्य विभागाकडून होत असला तरी पूर्व विदर्भात २२ ते ३१ ऑगस्ट दरम्यान ९ दिवसांत आढळलेल्या नवीन डेंगीच्या रुग्णांमध्ये शहरात ५२, नागपूर ग्रामीणमध्ये २९० तर वर्धेत ६२, भंडारा जिल्ह्यात १३, गोंदियात ३१, चंद्रपूर जिल्ह्यात ५२, गडचिरोलीतील ६ अशा एकूण ५४० डेंगीग्रस्त आढळून आले आहेत. यामुळे आतापर्यंत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये डेंगी रुग्णांची संख्या २ हजार २१० झाली आहे.

जिल्हा रुग्ण मृत्यू

  • नागपूर (श.) -६१७ -३

  • नागपूर (ग्रा.) -७९० - ३

  • वर्धा -२५८ -१

  • भंडारा -३६ -१

  • गोंदिया -१२१ - ०

  • चंद्रपूर -३६० - १

  • गडचिरोली -२८ -०

loading image
go to top