esakal | "आपले मुख्यमंत्री आशावादी आहेत पण स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत"; देवेंद्र फडणवीसांचा टोला 
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadanvis criticize Shivsena in Nagpur

माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावलाय. तसंच इतरही अनेक महत्वाच्या विषयांवर त्यांनी भाष्य केलंय. 

"आपले मुख्यमंत्री आशावादी आहेत पण स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत"; देवेंद्र फडणवीसांचा टोला 

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपचे काही नेते यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांच्या ताशेरे ओढण्याचं काम दोन्ही पक्ष करत आहेत. २०५० साली मुख्यमंत्री म्हणून मीच उदघाटनाला येणार असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होतं. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावलाय. तसंच इतरही अनेक महत्वाच्या विषयांवर त्यांनी भाष्य केलंय. 

हेही वाचा - मेयोत रुग्णांच्या जीवाला धोका? अद्यापही नाहीत...

देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. 'आपले मुख्यमंत्री आशावादी आहेत, तसंच त्यांना स्वप्न बघण्याचीही सवय आहे, त्यामुळेच त्यांनी ५० वर्षानंतर मुख्यमंत्री असण्याचं स्वप्न बघितलं मात्र स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत' अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तसंच संजय राऊत यांच्या कोणत्याही विधानावर प्रतिक्रिया देणार नसल्याचं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. 

गुंतवणुकीबाबत आनंद पण...

राज्यात हळूहळू गुंतवणूक वाढत आहे याचा नक्कीच आनंद आहे. मात्र यापैकी बरीचशी गुंतवणूक ही भाजपच्या काळातील आहे. ज्यावेळी भाजप सत्तेत होता त्यावेळी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मात्र आता गुजरात आणि कर्नाटक या दोन राज्यांनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. त्यामुळे राज्याचा दर्जा घसरला आहे असंही फडणवीसांनी म्हंटल आहे. 

शिवसेना बदलतेय ही चांगली बाब

शिवसेना ही पूर्वीची राहिली नाही, शिवसेना हा पक्ष हळूहळू बदलत चालला आहे. मात्र ही बाब चांगली आहे. कारण प्रकल्पांना विरोध करण्याची शिवसेनेची भूमिका बदलत चालली आहे. जैतापूर प्रकल्पामध्ये मोबदला मिळाला म्हणून तो प्रकल्प होत आहे मात्र याचा मोबदला नक्की कुणाला मिळाला हे बघणं महत्वाचं असणार आहे अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे. 

नक्की वाचा - शेतकरी दिवस : चौधरी चरणसिंह  केवळ सहा महिने पंतप्रधान असूनही त्यांच्या काळात शेतकरी होते सुखी

नाणार प्रकल्प नागरिकांना हवाय 

नाणार हा प्रकल्प लोकांना हवा आहे. स्थानिकांचा विरोध होतो म्हणून प्रकल्पाना विरोध करण्याची भूमिका शिवसेनेनं बदलली पाहिजे असंही यावेळी फडणवीसांनी म्हंटलंय. 
 

loading image