Video : सरकारचे सल्लागार निघाले राज्याला बुडवायला; असे का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis made allegations against the state government
Devendra Fadnavis made allegations against the state government

नागपूर : महाविकासआघाडी सरकारचे सल्लागार कोण आहेत, ते कळत नाही. जे कुणी आहेत, ते राज्य बुडवायला निघाले आहे. तसेच सरकारलाही ते बुडवत आहे. महाराष्ट्रात फक्त पोरखेळ चालला आहे. सरकारने चुकीचे काम करायचे आणि न्यायालयाने चूक दाखविल्यावर न्यायव्यवस्थे दोष द्यायचे हे न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी सरकार बीकेसीची जागा घेत आहे. बीकेसीची जागा प्राईस लॅंड आहे. बीकेसीमध्ये यापूर्वी जी शेवटची विक्री केली, ती १,८०० रुपये प्रतिहेक्टरच्या भावाने केली आहे. २५ हेक्टर जागा या कारशेडसाठी लागेल. म्हणजे २५ ते ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महाग जागा कारशेडसाठी द्यावी लागेल.

बुलेट ट्रेनचे स्टेशन जमिनीच्या आत तीन लेव्हलवर होणार आहे. जमिनीवर केवळ ५०० मीटरची जागा ते घेत आहेत. त्याच्यावर इंटरनॅशनल सेंटरच्या इमारती होणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.

आता जर आपण बुलेट ट्रेनचे स्टेशन जमिनीच्या खाली करायचे ठरवले तर त्याचा खर्च किमान पाच ते सहा हजार कोटी रुपये असेल. त्यामुळे आता ५०० कोटी रुपयांत तयार होणाऱ्या डेपोसाठी सहा हजार कोटी रुपये लागले आणि राज्याला मोठा भुर्दंड बसेल.

वार्षिक देखभालीचाही खर्च पाच ते सहा पट वाढणार आहे. भलतेसलते निर्णय घेऊन पोरखेळ करून मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र सुरू आहे. यामध्ये महाराष्‍ट्राचे मोठे नुकसान आहे. महाराष्ट्राचे प्रोजेक्ट अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

सरकारच प्रोजेक्ट बंद करायला निघाली

बुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी सरकार बीकेसीची जागा घेत आहे, बीकेसीची जागा ही प्राईस लँड आहे. त्यामुळे २५ हेक्टर जागेसाठी २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा खर्च लागेल. तसेच जमिनीखाली डेपो करीत असल्याने पाचशे कोटी रुपयांचे काम पाच हजार कोटींवर नेले जात आहे. त्यामुळे सरकारच राज्यातील सर्व प्रोजेक्ट बंद करायला निघाली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

न्यायालयाच्या बाबतीत बोलताना संयम ठेवला पाहिजे

न्यायालयाच्या बाबतीत बोलताना प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे. आपण चुका करायच्या अन् न्यायालयाने विरोधात निकाल दिला की त्याचे खापर न्यायालयावर फोडायचे, हा प्रकार बंद केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या निर्णयाबाबत केलेल्या वक्तव्यावर नाव न घेता दिली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com