esakal | मुस्लिमबहुल भागात लसीकरणाबाबत निरुत्साह; प्रति केंद्र शंभर लसीचे लक्ष्य अपूर्णच

बोलून बातमी शोधा

Discouragement of vaccination in Muslim-majority areas The target of 100 vaccines per center is incomplete

ताजबाग प्राथमिक आरोग्य केंद्रात ८६ जणांनी लसीकरण केले. ताजबाग आरोग्य केंद्रांच्या बाजूलाच असलेल्या दिघोरी येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात तीनशेवर नागरिकांनी लस घेतली. परंतु मुस्लिम बहुल भागांमध्ये लसीकरणाबाबत निरुत्साहावर अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनीही चिंता व्यक्त केली. 

मुस्लिमबहुल भागात लसीकरणाबाबत निरुत्साह; प्रति केंद्र शंभर लसीचे लक्ष्य अपूर्णच
sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : शहरात पात्र असलेले प्रत्येकच जण कोव्हीड लस टोचून घेण्यासाठी उत्साही आहेत. दररोज पंधरा हजारांवर नागरिक लसीकरण करून घेत आहेत. गांधीनगरातील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात एका दिवशी आठशे जणांच्या लसीकरणाची नोंद झाली. परंतु, मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये अद्यापही लसीकरणाबाबत उत्साह नसल्याचे चित्र त्या परिसरातील केंद्रांवरील आकडेवारीतून दिसून येत आहे.

कोरोनाबाधितांची तसेच बळीची दररोज वाढणाऱ्या संख्येमुळे लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. लसीकरण केल्यानंतर शेकडो नागरिक सोशल मिडियावर लस घेतानाचे फोटो अपलोड करीत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनजागृतीनंतरही शहरातील मुस्लिमबहुल भागात लसीकरणाबाबत निरुत्साही वातावरण आहे.

महत्त्वाची बातमी - किडनी घेता किडनी, कुणी आहे का? खासगी रुग्णालयांसमोर अनेकांना करतो विचारणा

शनिवारी दिवसभरात शहरातील ८९ केंद्रांवर १५ हजार ८७१ नागरिकांनी लस घेतली. यात दुसरा डोज घेणाऱ्या ५०० नागरिकांचाही समावेश आहे. यात गांधीनगरातील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय लसीकरण केंद्रावर सर्वाधिक ८७८ जणांनी गर्दी केली. याशिवाय केटीनगरातील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ६२५, महाल येथील दटके रुग्णालयात ५१०, इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ५०४ जणांनी लस घेतली. याशिवाय महापालिका, शासकीय तसेच खाजगीतील ४६ केंद्रांवर १०० ते ५०० जणांनी लसीकरण केले. परंतु मुस्लिमबहुल भागातील लसीकरण केंद्रांवर शंभर जणांनीही लसीकरण केले नसल्याची बाब पुढे आली आहे.

मोमीनपुरा या मुस्लिम भागाला लागूनच मेयो रुग्णालय असून येथे दोन केंद्र आहेत. परंतु या दोन लसीकरण केंद्रात ५३ व ७०, असे एकूण १२३ जणांनी लसीकरण केले. महापालिकेच्या गरीब नवाजनगर परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ ७१ जणांनी लसीकरण केले.

जाणून घ्या - अत्याचारानंतर विद्यार्थिनी चार महिन्यांची गर्भवती; ‘हेल्थ चेकअप’मध्ये आले सत्य पुढे

ताजबाग प्राथमिक आरोग्य केंद्रात ८६ जणांनी लसीकरण केले. ताजबाग आरोग्य केंद्रांच्या बाजूलाच असलेल्या दिघोरी येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात तीनशेवर नागरिकांनी लस घेतली. परंतु मुस्लिम बहुल भागांमध्ये लसीकरणाबाबत निरुत्साहावर अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनीही चिंता व्यक्त केली. 

लसीकरणाला मिळालेला प्रतिसाद

  • १ ते १०० ४३ 
  • १०० ते २०० २७ 
  • २०० ते ३०० ०६ 
  • ३०० ते ४०० ०८ 
  • ४०० ते ५०० ०५ 
  • पाचशेवर ०४

भूमिका

मुस्लिम बहुल भागात लसीकरण वाढविण्याची गरज आहे. यासाठी मोमीनपुरा व इतरही मुस्लिमबहुल वस्त्यांमध्येच थेट तेथील नागरिक येऊ शकतील, असा अंतरावार लसीकरण केंद्र उघडण्याची तत्परता महापालिकेने दाखविणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर मशिदीतील इमाम यांना विश्वासात घेऊन मुस्लिम वस्त्यांतील नागरिकांना लसीकरणासाठी प्रेरित करण्याकरिता पाऊले उचलणे अत्यावश्यक झाले आहे.

अधिक वाचा - कुख्यात गुंड रणजित सफेलकरवर माजी मंत्र्यांचा वरदहस्त, पाच-पन्नास रुपायांची सवारी मारणारा ऑटोचालक झाला कोट्यधीश

काही दिवसांत प्रयत्नांना यश मिळेल
मी व कुटुंबीयांचे लसीकरण झाले. मुस्लिमबहुल भागात लसीकरण व्हावे, यासाठी महापालिकेचे सर्व प्रयत्न सुरू आहे. या भागांमध्ये लसीकरणासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. काही दिवसांत या प्रयत्नांना यश मिळेल, याची खात्री आहे. 
- डॉ. अतिक खान,
वैद्यकीय अधिकारी, महापालिका