esakal | बाप रे! प्रचंड डोकेदुखी असल्यानं डॉक्टरकडे गेली महिला; शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूतून निघाला टेनिसबॉलच्या आकाराचा गोळा
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor Found Tennis Ball Size Tumor in womans Brain in Nagpur Latest News

शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या डोक्यातून टेनिसबॉलच्या आकाराची भयंकर गोष्ट बाहेर आली. हे बघून डॉक्टरांनाहे आश्चर्याचा धक्का बसला.  

बाप रे! प्रचंड डोकेदुखी असल्यानं डॉक्टरकडे गेली महिला; शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूतून निघाला टेनिसबॉलच्या आकाराचा गोळा

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर ः ज्येष्ठ महिलेस दीर्घ काळापासून डोकेदुखीचा त्रास होता. नजरही कमी झाली होती. चालताना तोल जात होता. डावा हात व पायातील बळ कमी झाले होते. एमआरआय निदानातून मेंदूच्या मध्यभागी दोन ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या डोक्यातून टेनिसबॉलच्या आकाराची भयंकर गोष्ट बाहेर आली. हे बघून डॉक्टरांनाहे आश्चर्याचा धक्का बसला.  

डोके दुखत असल्याने महिला डॉक्टरकडे आली. त्यांच्या मेंदूच्या मध्यभागी टेनिसबॉलच्या आकाराचा ट्यूमर तयार झाल्याचे आढळले. अतिशय गुंतागुंतीची दुर्मीळ शस्त्रक्रिया डॉ. प्रमोद गिरी यांनी आज केली. महिलेचा जीव वाचवला. आतापर्यंतचा शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आलेला सर्वांत मोठा ट्यूमर होता, असा दावा डॉ. गिरी यांनी केला आहे. 

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

६.७ सेंटिमीटर आकाराचा ट्यूमर असल्याचे डॉ. गिरी म्हणाले. वैद्यकीय भाषेत याला ‘व्हेलम इंटरपोजिटम मिनिनजोमा’ असे म्हणतात. आतापर्यंत दहापेक्षा कमी रुग्णांवर ही शस्त्रक्रिया झाली असल्याची नोंद आहे. 

तुलनेत ट्यूमर आकाराने मोठा असल्याची नोंद झाली. मेंदूच्या पेशी व रक्तवाहिन्यांच्या गुंतागुंतीमुळे ही शस्त्रक्रिया अतिशय अवघड होती. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठ नागरिक रुग्णांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर आहे. डोकेदुखी पूर्णपणे थांबली आहे. रुग्ण सर्वांना ओळखतो. न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी व त्यांच्या पथकातील डॉ. संजोग गजभिये, डॉ. शिवाजी देशमुख, डॉ. आदमणे, डॉ. तुषार येळणे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. 

जाणून घ्या - अखेर वाघीण आणि बछड्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं; शवविच्छेदनात पुढे आला धक्कादायक प्रकार

मागील सात वर्षांत मध्यभारतातील न्यूरान रुग्णालयात मेंदूवरील १७ हजारांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. तब्बल १ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद आंतररुग्ण विभागात झाली आहे. दरवर्षी बाह्यरुग्ण विभागात ९० हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. 
-डॉ. प्रमोद गिरी, 
न्यूरोसर्जन, नागपूर.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top