esakal | घरच्या कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक रडत होते ढसा ढसा, डॉक्टरांनी दिली रुग्ण जिवंत असल्याची बातमी, वाचा संपूर्ण प्रकार...
sakal

बोलून बातमी शोधा

Doctors pronounced the living patients dead

कोरोनाबाधित रुग्णावर उरचार करण्यासाठी डॉक्टरांनी घाई केली. मात्र, रुग्णाची स्थिती गंभीर अकल्याने डॉक्टरांनी जीव वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला. रुग्णाकडून उपचाराला प्रतीसाद न मिळल्याने मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णाला मृत घोषित केल्याने नातेवाईकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

घरच्या कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक रडत होते ढसा ढसा, डॉक्टरांनी दिली रुग्ण जिवंत असल्याची बातमी, वाचा संपूर्ण प्रकार...

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. मेडिकल, मेयोमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. रुग्णसेवा देताना डॉक्टरांची दमछाक होत आहे. वाढते रुग्ण आणि रोज होणाऱ्या मृत्युंमुळे डॉक्टरांवरील ताण वाढला आहे. यामुळे इतर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. याच दुर्लक्षामुळे एका कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकल्याचा प्रकार मेडिकलमध्ये घडला...

शहरात आता कोरोनाच्या विषाणूने उग्ररूप धारण केले आहे. जिल्हा कोरोनाग्रस्त होत असून, प्रादुर्भावाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. जुलैमध्ये नागपूरवर पडलेले मृत्यूचे सावट दूर न होता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते आणखीनच गडद झाले आहे. मेडिकल, मेयोमध्ये रोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित उपचारासाठी दाखल होत आहे. तसेच मेडिकलमध्ये कोरोनबाधित रुग्णासोबतच इतरही आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

हेही वाचा - ‘ते’ पाच मृतदेह पाहून गहिवरले वडगावचे अख्खे शिवार, थरथरल्या हातांनी केले सामूहिक अंत्यसंस्कार...

वाढतच चाललेल्या रुग्णांमुळे डॉक्टरांवरील ताण वाढत चालला आहे. रुग्णसेवेवर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. गुरुवारी कोरोनाबाधित रुग्ण व इतर आजाराचा रुग्ण एकाचवेळी दाखल झाले. कोरोनाबाधित रुग्णावर उरचार करण्यासाठी डॉक्टरांनी घाई केली. मात्र, रुग्णाची स्थिती गंभीर अकल्याने डॉक्टरांनी जीव वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला. रुग्णाकडून उपचाराला प्रतीसाद न मिळल्याने मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णाला मृत घोषित केल्याने नातेवाईकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

फाइलची झाली अदलाबदल

गुरुवारी (ता. ६) कामठी येथील ७० वर्षीय रुग्णाला मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याचवेळी ताजबाग परिसरातील ६५ वर्षीय पुरुष रुग्णालाही भरती केले होते. ७० वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले. या घाईगर्दीत ६५ वर्षीय रुग्णाची फाईल ७० वर्षीय रुग्णाच्या खाटेवर गेली. उपचार सुरू असताना या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली.

अधिक माहितीसाठी - ...आणि बहिणींची इच्छा अपूर्णच राहिली, भावावर काळाचा घाला; अपघातात अकाळी मृत्यू

मृतदेह बघताच उडाला गोंधळ

कोरोनाबाधित व दुसऱ्या आजाराचा रुग्ण एकाचवेळी आल्याने दोघांची फाईल तयार करण्यात आली. मात्र, घाईघाईत उरचार सुरू असताना दोन्ही रुग्णांची फाईलची अदलाबदल झाली. यामुळे डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला कागदोपत्री मृत्यू घोषित केले. यामुळे नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली. मृतदेह ताब्यात देण्यापूर्वी ओळख पटवली जाते. त्यावेळी नातेवाईंकानी मृतदेह आपल्या ओळखीचा नसल्याचे सांगताच गोंधळ उडाला. नंतर प्रशासनाने सारवासारव केली. मेडिकलमधील या प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top