सत्ताधारी, विरोधकांमध्ये वाढली धाकधूक; काहींना पराभव, धनाची चिंता

सत्ताधारी, विरोधकांमध्ये वाढली धाकधूक; काहींना पराभव, धनाची चिंता

नागपूर : ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोट निवडणूक (By-election for Zilla Parishad) होणार आहे. अल्पावधीचे सदस्यत्वही रद्द झालेले पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. तरी काहींचा पत्ता कापणार असल्याची चर्चा आहे. तर काहींना पराभव व धनाची चिंता आहे. मागील निवडणूक काळातील परिस्थिती आता नसल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धाकधूक वाढली आहे. (Due-to-Zilla-Parishad-elections-there-was-a-lot-of-panic-among-the-ruling-party-and-the-opposition)

नागपूर जिल्हा परिषदेत ५८ सदस्य आहेत. यात ओबीसी वर्गातून १६ सदस्य निवडून आले होते. जिल्हा परिषदेतील आरक्षणाची टक्केवारी ५० च्या वर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण अवैध ठरवत सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द करीत खुल्या प्रवर्गातून सर्व जागा भरल्याचे आदेश दिले. यात उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, विरोधी पक्ष नेते अनिल निधान, राष्ट्रवादीचे गट नेते चंद्रशेखर कोल्हे, अवंतिका लेकुरवाळे, राजेंद्र हरडे, देवका बोडखे, पुनम जोध, समिर उमप, ज्योती सिरसकार, अर्चना भोयर, कैलास राऊत, योगेश देशमुख, ज्योती राऊत, सुचिता ठाकरे, अर्चना गिरी, भोजराज ठवकर यांना फटका बसला.

सत्ताधारी, विरोधकांमध्ये वाढली धाकधूक; काहींना पराभव, धनाची चिंता
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

आता नव्याने निवडणुका होणार आहे. सदस्यत्व रद्द झालेल्या काही सदस्यांचा पत्ता कापण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीतील राजकीय समिकरणात आजच्या घडीला बदल झाला आहे. काही ठिकाणी दावेदार वाढणार आहेत. काही सर्कलमध्ये माजी सदस्यांना विरोध होत आहे. काही उमेदवार भविष्यात डोईजड ठरण्याची भीती इतरांना आहे. त्यामुळे पक्षातील नेत्यांकडून त्यांना धोका असल्याची भीती आहे.

अशात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागण्यास असल्याची चर्चा आतापासूनच रंगली आहे. सर्व जागा खुल्या झाल्याने काही ठिकाणचे राजकीय आणि सामाजिक समिकरण बदलले आहे. यात मुख्यतः आदिवासी असणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ओबीसी वगळता आदिवासी समाजातील उमेदवार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सत्ताधारी, विरोधकांमध्ये वाढली धाकधूक; काहींना पराभव, धनाची चिंता
नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी; पोहण्याचा मोह बेतला जिवावर

एवढा पैसा लावायचा कसा?

धनाचीही चिंता अनेकांना आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीतच ३० ते ६० लाखांपर्यंतच खर्च झाल्याचे सांगण्यात येते. आता पुन्हा कमी जास्त प्रमाणात तेवढाच खर्च येणार असल्याचे सांगण्यात येते. एवढा पैसा लावायचा कसा? त्यातही पराभव मिळाल्यास मोठा आर्थिक फटका बसेल. त्याही दृष्टिकोनातून उमेदवार विचार करीत असल्याचे बोलले जात आहे.

(Due-to-Zilla-Parishad-elections-there-was-a-lot-of-panic-among-the-ruling-party-and-the-opposition)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com