नागपूर : आतातरी जलदगती न्यायालयांची स्थापना करा; चित्रा वाघ

पीडित महिलेची घेतली भेट
BJP Chitra Wagh
BJP Chitra Wagh

नागपूर : महिला अत्याचाराच्या घटनांवरील सुनावणीसाठी राज्य सरकारने लवकरात लवकर जलदगती न्यायालयांची स्थापना करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली. भंडारा येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेची दखल घेत त्यांनी आज मेडिकलमध्ये जाऊन पीडितेची भेट घेतली.

दिल्लीतील निर्भया घटनेप्रमाणेच ही घटना देखील तेवढीच घृणास्पद असून या घटनेची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे. अत्याचाराच्या घटनांमध्ये सुनावणीसाठी ‘विशेष न्यायालये’ असावीत अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात अशी विशेष न्यायालये असावीत तसेच पीडितांना जलद गती न्यायासोबतच शासनाच्या मनोधैर्य योजनेतून लाभ मिळावा अशी मागणी करीत वाघ यांनी आघाडी सरकारच्या काळात मनोधैर्य योजनेसाठी अल्प निधी ठेवल्याचा आरोप केला.

आघाडीची नुसती घोषणाच

हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापक तरुणीला भर रस्त्यात पेटवून देण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलदगती न्यायालयामध्ये अशा घटनांची सुनावणी घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र, अडीच वर्षांच्या त्यांच्या सत्ताकाळात राज्यात जलदगती न्यायालयाची स्थापनाच झाली नाही, असे त्या म्हणाल्या.

नाना पटोले बॅकफूटवर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विषयीची चित्रफित आपण व्हायरल केली होती. त्याचा कुठलाही पाठपुरावा घेतला जात नाही याचे कारण विचारता चित्रा वाघ म्हणाल्या, मी फक्त नाना तुम्ही पण का? एवढाच प्रश्‍न त्यांना सोशल मीडियावर विचारला होता. याचे उत्तर त्यांनी देणे अपेक्षित आहे. त्यांना आता कोर्टात जायचे असेल तर खुशाल जाऊ शकतात. माझ्या माघारीचा प्रश्नच उद्‍भवत नसल्याचे त्या म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com