Exam Phobia : वर्गात नेहमीच टॉपर असणाऱ्या मुलाचे परीक्षेच्या भीतीने पलायन

परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या दिवशीच तो घाबरून पळाला
Exam Phobia topper student scared of exam school parents health
Exam Phobia topper student scared of exam school parents health sakal

नागपूर : वर्गात नेहमीच टॉपर असणाऱ्या मुलाने परीक्षेच्या तणावातून रेल्वेने पळ काढला. मात्र, नागपूरच्या लोहमार्ग पोलिसांनी सूचना मिळताच मुलाचा शोध घेऊन मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर त्याला ताब्यात घेतले.

Exam Phobia topper student scared of exam school parents health
CBSE : परीक्षेदरम्यान पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सीबीएसईचे आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, पळालेला मुलगा डोंगरगड भागाचा राहणारा आहे. तो यंदा १० व्या वर्गात सीबीएससीचे शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील व्यावसायिक आहेत. तो वर्गात नेहमीच टॉपर राहायचा. मात्र, मनासारखा अभ्यास न झाल्याने तो तणावात राहू लागला. परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या दिवशीच तो घाबरून पळाला.

Exam Phobia topper student scared of exam school parents health
Exam Tips : मुलांना परीक्षेचा ताण येतोय? या ५ योगासनांनी वाढेल एकाग्रता

बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने चिंतित पालकांनी राजनांदगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. मुलाकडे मोबाईल होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याचे लोकेशन मिळविले. तो नागपूर स्थानकावर असल्याचे लक्षात आले.

लगेच तेथील पोलिसांनी नागपूर लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फलाट क्रमांक तीनवरून मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी आधी त्याचे समुपदेशन केले. नंतर त्याच्या पालकांना सूचना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com