Nagpur : आई रागावल्याने टोकाचे पाऊल, मुलीच्या आत्महत्येने हळहळले समाजमन

१२ वर्षीय मुलीची साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या
Nagpur
Nagpur esakal

नागपूर : आईने सकाळी पैशावरून रागावल्याने १२ वर्षीय मुलीने साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी गोपालनगरातील जोशीवाडी येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Nagpur
Height Tips : लहान मुलांची उंची वाढवायची आहे? मग, आजच त्यांच्या आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

निशीला संजय बागडे असे मुलीचे नाव आहे. ती सरस्वती हायस्कूल येथे सहाव्या वर्गात शिकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशीलाची आई रंजू संजय बागडे (वय ३३) या शिक्षिका आहे. वडील संजय हे मेकॅनिक असून लहान भाऊ दुसऱ्या वर्गात शिकतो. बुधवारी सकाळी आई शाळेत जात असताना तिने आईला काहीतरी कामासाठी पैसे मागितले. यावरून तिच्या आईने तिला रागावले आणि शाळेत निघून गेली. त्यानंतर निशीलाही शाळेत गेली.

Nagpur
Oily Skin Tips : तेलकट त्वचेसाठी मॉईश्चरायझरची निवड करताय? मग, चेहऱ्यावर लावताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

मात्र, रागीट स्वभावाची असल्याने आईने रागविल्याचे मनात धरून साडेदहा वाजता ती शाळेतून परतली. लहान भाऊ घरीच होता आणि आजी कमला मधुकर बागडे (वय ६२) या घरकामासाठी गेल्या होत्या. लहान भाऊ साडेअकरा वाजता शाळेकडे निघताच, निशीलाने दार बंद केले. आईची साडी हॉलमधील सिलींग फॅनला बांधली आणि गळफास घेत आत्महत्या केली.

Nagpur
Yoga Tips : ‘या’ योगासनांचा सराव प्रत्येक गृहिणीने करायलाच हवा, तंदूरूस्तीसाठी आहे फायदेशीर

दुपारी दोन वाजताच्या सुमारास आजी कमला घरी परतल्या. दार आतून बंद असल्याने त्यांनी निशीलाला आवाज दिला. प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून बघितले असता, त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तिला खाली उतरवून मेडिकल हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यामुळे बागडे परिवारावर संकट कोसळले. आजी कमला मधुकर बागडे यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिस उपनिरीक्षक मनोहर दंदाले यांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेत, तपास सुरू केला आहे.

वर्षभरात ३० मुलांची आत्महत्या

गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांच्या आत्महत्या चिंतेचा विषय ठरला आहे. त्यानुसार, २०२३ मध्ये शहरात ३० च्यावर चिमुकल्यांनी क्षुल्लक कारणाहून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२२ मध्ये १३ मुलांनी आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांमध्ये मुलांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये सात पटीने वाढ झालेली आहे. २०२४ मध्ये ही पहिलीच घटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com