अरे हे काय, आदेश असतानाही कारखाने सुरूच ?

 बाजारगाव   :  सुरू असलेल्या कारखान्यातील एकत्र आलेले कामगार.
बाजारगाव : सुरू असलेल्या कारखान्यातील एकत्र आलेले कामगार.


नागपूर : आमची कंपनी फॉर्मसिस्टमध्ये मोडते, असे सांगून मौदा परिसरातील एका नामांकित कंपनीने शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही काम सुरूच ठेवले, तर कोंढाळी, केळवद आणि बाजारगाव परिसरातही हीच स्थिती असल्याचे निदर्शनास आले.


परिसरातील एक नामांकित कंपनी इंजिनिअरींग कंपनी म्हणून भारतात ओळखली जाते. यात ऍल्युमिनियम सीट्‌स तयार करण्यात येतात. फक्त एक विभाग फॉर्मसिस्ट (कॅप्सूलचा वरचे पातळ आवरण) आहे. त्यात दररोज 5-6 कर्मचारी काम करतात. हा कच्चा माल बनविण्याचे काम येथे होते. कंपनीत स्थायी कर्मचारी, अधिकारी व कंत्राटदार कर्मचारी अशी एकूण संख्या सुमारे 700 च्या जवळपास काम करीत आहेत.
रविवारचा जनता कर्फ्यू असतानाही कंपनीने सकाळी 6 वाजता कर्मचारी बोलावून कंपनी सुरू ठेवलेली होती. ही कंपनी फॉर्मसिस्ट कंपनी आहे, असा कोणताही करार झालेला नाही. आजही कंपनी सुरूच आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव तुळशीदास पटले यांनी दिली.

अनेक राज्यांतून येतात कामगार
कंपनीचा कच्चा माल हा ओडिशा, झारखंड व इतर राज्यांतून ट्रकद्वारे येत आहे. हे ट्रक कंपनीच्या आत जातात व तेथील कर्मचाऱ्यांच्या ते संपर्कात येतात. आज सुमारे 700 लोक काम करीत आहेत. कोरोना व्हायरसचा एखादा पॉझिटिव्ह रुग्ण आला तर येथील कामगारांना लागण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 700 लोकांमागे त्यांचे परिवार आहेत. व्यवस्थापन एचआर हेड सरदेशपांडे यांना फोन केला असता उत्तर मिळाले नाही.

उपविभागीय अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.
उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले व तुळशीदास पटले यांच्या पत्रानुसार तालुक्‍यातील हिंडालको, विशाखा, गोपाल, रिलायन्स, रामदेवबाबा सालवेट, दिवानका, प्रेम ग्लास, अल्ट्राट्रेक सिमेंट या कंपन्यांना बंद ठेवण्यात यावे, तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत, असे पत्र उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून आज देण्यात आले.

आदेशाला केराची टोपली
केळवद  : नजीकची एक कंपनी मात्र आदेशाचे पालन न करता, सर्रास हा कारखाना सुरूच आहे. कारखान्यात जवळपास800 कामगार काम करीत आहेत. अशात तीन पाळ्यात सुरू असणारा हा कारखाना बिनधास्तपणे सुरू असल्याने या कारखान्यात काम करणाऱ्या आठशे कामगारांच्या जिवाला धोका असून याला कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जमावबंदीच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याने या कारखान्याला कोणत्याच नियमाच्या आदेशाचे पालन करण्याची सक्ती नाही काय, असा सवाल कामगारांनी आणि या भागातील नागरिकांनी केला आहे.

कोंढाळीचा बारुद कारखाना सुरूच
बाजारगाव  : बाजारगाव परिसरातील मोठमोठे कारखाने सोलार, इकॉनॉमिक्‍स, पार्कर, स्टील प्लांट रामसन्स, पेपर मिल आदी बंद असूनसुद्धा बारुद कंपनी सुरू असल्याची माहिती मिळाली. लगेच "सकाळ'च्या स्थानिक प्रतिनिधींनी कंपनीला स्वतः भेट दिली असता तेथे कामगार काम करीत असल्याचे चित्र दिसून आले. कंपनी आज सकाळपासून सुरू असल्याचे येथील कामगारांनी सांगितले. कंपनीतील व्यवस्थापक रंजीत कुमार सिंग यांनी कंपनीतल्या कामगारांना बोलावून काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले. शासनाने 31 मार्चपर्यंत सर्व कारखाने, पानठेले, मॉल, रेस्टॉरंट तसेच जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने दुकाने वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल होते. हा बारूद कारखाना सुरू कसा, असा सवाल येथील कामगार व परिसरातील लोक करीत आहेत. शासनाने पाचपेक्षा अधिक नागरिक उभे राहू नये, अन्यथा 144 कलम लावण्याचे आदेश दिले. या कंपनीत सर्रास दीडशे ते दोनशे कामगार काम करताना दिसल्याचे चित्र होते. सचिन मेश्राम, शुभम वरठी, शुभम बनसोड, सचिन टाले, विनोद टाले, अतुल बनसोड, आशीष मेश्राम, विनोद देशमुख, नीलेश क्षीरसागर, संजय नेहारे, अनिल दुधकोहळे, मुकेश राऊत, रवी दुपारे, प्रमोद नेहारे, दिनेश सहारे, प्रफुल्ल मसराम, सुधाकर पंचभाई, चंद्रभान येलेकर आदी कामगारांनी व्यवस्थापनावर रोष व्यक्त केला.

संचारबंदी कायद्यानुसार कारखाना बंद होणार
जीटीएन कारखान्यात आठशे कामगार काम करीत असल्याने अशातच जमावबंदी कायद्यानुसार हा कारखाना लवकरच बंद करण्यात येईल.
दीपक कारंडे
तहसीलदार, सावनेर

31 मार्चपूर्वी कंपनी बंद करा
कोरोना वायरसची भयंकर साथ पसरली असतानासुद्धा कंपनी चालू आहे. त्वरित कंपनी 31 मार्चपूर्वी बंद करण्यात यावी. याकरिता निवेदन देण्यात आले आहे.
मनोज दवे, उपाध्यक्ष  इंडस्ट्रीज कामगार संघटना मौदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com