esakal | Video : बॉक्‍सर मुलाच्या अंत्ययात्रेत वडिलांनी वाजवला 'डीजे', हे आहे कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Father played the DJ in Boxing player Sons funeral Function in Nagpur

28 जानेवारीला रोहतक शहरातील साई सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी पार पडली. यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा प्रणव हा हरियाणाच्या बॉक्‍सरपटूसोबत झालेल्या सामन्यात पराभूत झाला होता. यामुळे त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली नव्हती.

Video : बॉक्‍सर मुलाच्या अंत्ययात्रेत वडिलांनी वाजवला 'डीजे', हे आहे कारण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लग्नाच्या वरातीत डीजेच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी हे दृश्‍य नवीन नाही. आनंद साजरा करण्यासाठी सर्वजण लग्न, आंनद, रॅली, मिरवणूक, कार्यक्रम आदींमध्ये डीजे लावत असतात. यातून ते आपला आनंद व्यक्‍त करीत असतात. परंतु, शनिवारी नागपुरात एक अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत चक्‍क "डीजे' लावण्यात आला होता. अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांच्या चेहऱ्यावर दु:ख होते, सारे शोकमग्न होते व डोळ्यात अश्रू तरळत होते. ही अंत्ययात्रा होती बॉक्‍सर प्रणव राष्ट्रपाल राऊत (वय 22) याची... 

राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेता असलेला क्रीडा प्रबोधनीचा बॉक्‍सर प्रणव याने शुक्रवारी सकाळी 9.30 मिनिटांनी क्रीडा प्रबोधिनीच्या वसतिगृहातील खोली क्रमांक चारमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. अकोला शहरातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये मुळचा नागपूरचा रहिवासी असलेला प्रणव राऊत हा दैनंदिनीप्रमाणे सरावासाठी गेला होता. येथे एका स्थानिक सामन्याचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सर्वजण क्रीडा प्रबोधिनीतच्या वसतिगृहात परत आले. 

जाणून घ्या - अनैतिक संबंधात तो ठरत होता अडसर, दिली तिने त्याची सुपारी

काही वेळांनी मित्र प्रणवला बोलवण्यासाठी खोलीकडे गेले. मात्र, त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. मित्राने जबरदस्तीने दरवाजा उघडला असता प्रणव गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. अकरावीत शिकत असलेल्या प्रणवने आत्महत्या केल्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ऐन उमेदीच्या वयात आत्महत्या करणाऱ्या मुलाच्या अंत्ययात्रेत वडिलांनी चक्‍क "डीजे' वाजवून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. 

प्रणवचे वडील राष्ट्रपाल हे नागपूर शहर पोलिस दलातील गणेशपेठ ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असून, तेही बॉक्‍सर आहेत. 28 जानेवारीला रोहतक शहरातील साई सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी पार पडली. यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा प्रणव हा हरियाणाच्या बॉक्‍सरपटूसोबत झालेल्या सामन्यात पराभूत झाला होता. यामुळे त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली नव्हती. या नैराश्‍यातून प्रणव जेथे दररोज सराव करायचा त्याच स्टेडियमजवळ गळफास लावून आत्महत्या केली. 

अधिक वाचा -  एका रात्री उपाशीपोटी झोपले भीमराव, सकाळी उठलेच नाही

अंतिम इच्छा केली पूर्ण

प्रणवने नैराश्‍यात टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये "बाबा मला माफ करा, मी तुमचे स्वप्न पूर्ण केले नाही', असे लिहिले होते. डीजेच्या तालावर आपली अंत्ययात्रा निघावी अशी प्रणवची अंतिम इच्छा होती. याबाबत तो कधी वडिलांशी बोलला असवा. म्हणूनच वडिलांनी त्याची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी अंत्ययात्रेत "डीजे' लावून अंतिम निरोप दिला.