esakal | अखेर तळीरामांनीच सांभाळली अर्थव्यवस्था, केवळ दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल
sakal

बोलून बातमी शोधा

fifty crores turnover of liquor business in two days

दारूविक्री सुरू होताच कोट्यांवधींचा निधी बाजारात आला. गेल्या दोन दिवसांत दारू व्यवसायात ५० कोटींच्यावर उलाढाल झाली. यातून राज्य शासनाला २ कोटींवर महसूल प्राप्त झाला. तर दारू पिणाऱ्यांची गर्दी पाहता विक्री आदेशात सुधारणा करण्यात आली. यानुसार आता पोलिस आयुक्त हद्दीत म्हणजे शहरालगतच्या ग्रामीण भागातील वाईन शॉप, बिअर शॉपींचे दुकाने बंद करण्यात आली असून शहराप्रमाणे घरपोच दारू मिळेल. देशी दारूची दुकाने मात्र सुरू राहतील.  

अखेर तळीरामांनीच सांभाळली अर्थव्यवस्था, केवळ दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिन्यांपासून दारू दुकाने बंद होती. परिणामी तळीरामांच्या घश्याला चांगलीच कोरड पडली. कधी एकदाचा दारूचा घोट घशात जातो, असे झाले होते. अखेर दोन महिन्यांनी दारूची दुकाने उघडली अन् तळीरामांचा जीव भांड्यात पडला. या काळात देशभरातील व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. केंद्र आणि राज्य शासनाच्या महसुलात देखील मोठी तूट निर्माण झाली. दरम्यान, दारूविक्री सुरू झाल्यामुळे सरकारला या व्यवसायातून महसूल मिळणे सुरू झाले आहे. सोशल मीडियावर तळीरामांचा खिल्ली उडवली जात होती. अखेर याच तळीरामांनी अर्थव्यवस्थेला आधार देणे सुरू केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये...

Video : विषाणूंपेक्षा जलद गतीने पसरताहेत विषाणुंसंदर्भातल्या अफवा, टोमँटोवर आला म्हणे विषाणु!

दारूविक्री सुरू होताच कोट्यांवधींचा निधी बाजारात आला. गेल्या दोन दिवसांत दारू व्यवसायात ५० कोटींच्यावर उलाढाल झाली. यातून राज्य शासनाला २ कोटींवर महसूल प्राप्त झाला. तर दारू पिणाऱ्यांची गर्दी पाहता विक्री आदेशात सुधारणा करण्यात आली. यानुसार आता पोलिस आयुक्त हद्दीत म्हणजे शहरालगतच्या ग्रामीण भागातील वाईन शॉप, बिअर शॉपींचे दुकाने बंद करण्यात आली असून शहराप्रमाणे घरपोच दारू मिळेल. देशी दारूची दुकाने मात्र सुरू राहतील.  
   
कोरोनाच्या नियंत्रणाकरिता करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली. यात दारू दुकानांचाही समावेश होता. जवळपास पावणे दोन महिन्यापासून दारू दुकाने बंद असल्याने पिणाऱ्यांची मोठी अडचण झाली होती. अखेर शुक्रवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुकाने सुरू झाली. ग्रामीण भागात दुकानातून आणि होम डिलेव्हरीची व्यवस्था करण्यात आली होती. तर शहरी भागात फक्त होम डिलिव्हरीच होती. तेही परवानाधारकांनाच ही देण्यात येणार आहे. शहरातील परवाना नसलेल्यांनीही शहर सीमेलगतच्या ग्रामीण भागात येणाऱ्या दारूच्या दुकानावर धाव घेतली होती. यामुळे ग्रामीण भागातील दारू दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडली होती.

शासनाला २ कोटींचा महसूल

शहरसीमेलगतच्या कामठी तालुक्यातील काही भाग व नागपूर ग्रामीण हद्दीत गर्दीमुळे एकच गोंधळ उडाला होता. गर्दी टाळा, असे वारंवार शासनाकडून सांगण्यात येत असतानाही गर्दी होत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दारूविक्रीबाबत काढलेल्या आदेशात बदल केला. दुसऱ्या दिवशीही दारू खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

नवीन सुधारित आदेश

नव्या आदेशानुसार यानुसार आता शहर सीमेलगतच्या शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील दारू दुकानातून आता दारूविक्री होणार नाही. येथून केवळ शहराप्रमाणेच घरपोच दारू मिळेल. देशी दारूची दुकाने मात्र सुरू राहतील.

चढ्या दराने विक्री

सुधारित आदेश आजपासूनच अंमलात आल्याने अनेक मद्यपींचा चांगलाच हिरमोड झाला आहे. यामुळे शहर व शहर सीमेलगतच्या परिसरातील परवाना नसलेल्या शौकिनांनी ग्रामीण भागातील दारू दुकानाकडे आपला मोर्चा वळविला होता. परंतु येथेही अनेक दुकानांतील दारूचा साठा संपुष्टात आला होता. तर ज्या ठिकाणी उपलब्ध होता तेथे चढ्या दरानेही विक्री होत असल्याचे काहींनी सांगितले.

शहरी भागात देशी दारू

शहरीभागात देशी दारू विक्री बंदी असतानाही काही वाईन शॉपमधून देशी दारूची विक्री करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून अडवणूक

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यात दारूविक्री सुरू करण्यात आली. घरपोच दारू देणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडे २४ बॉटल्स ठेवण्याचे अधिकार देण्यात आले. असे असताना पोलिसांकडून या डिलिव्हरी बॉयची अडवणूक होत आहे. एकप्रकारे शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचीच अवहेलना त्यांच्याकडून होत असल्याचे आरोप होत आहेत.

loading image