esakal | घटस्फोटित महिलेवर लैंगिक अत्याचार, प्रियकरासह तिघांवर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

file photo

घटस्फोटित महिलेवर लैंगिक अत्याचार, प्रियकरासह तिघांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मेसेजमुळे एका घटस्फोटित युवतीची युवकाशी मैत्री झाली. दोघांचे मोबाईलवरूनच प्रेम फुलले. घरी कुणी नसताना युवकाने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार दिला. तिला भाऊ आणि मित्राला तिच्या घरी नेऊन धमकी दिली. याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी प्रियकरासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. समीर रिजवान शेख (वय ३३ रा.सद्भावनानगर), त्याचा भाऊ व मित्र परवेज ,अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ४ लाख पार; आज नव्या ७,४९६ रुग्णांची भर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार पीडित २८ वर्षीय युवती रिया (बदललेले नाव) हिचे लग्न झाले होते. परंतु, पतीसोबत न पटल्याने तिने २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. तेव्हापासून ती माहेरी राहत होती. समीर हा खासगी काम करतो. जानेवारी महिन्यात समीर याने पीडित युवतीच्या मोबाइलवर चुकून 'हाय' असा मेसेज पाठविला. रियाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर समीरला रियाने व्हॉट्सअ‌ॅपवर प्रत्युत्तर देत विचारणा केली. रॉंग नंबर लागल्यानंतरही दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली. समीर याने तिला केडीके कॉलेजसमोर भेटायला बोलाविले. रियाने त्याला होकार दिला. समीर याने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दोघेही तीन महिने 'लिव्ह इन`रिलेशनशिप' मध्ये राहिले. पाच दिवसांपूर्वी समीर याने पीडित महिलेला लग्नास नकार दिला. महिलेने नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आली. त्यावेळी समिरचा भाऊ आणि मित्राने तिला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने नंदनवन पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न -

समिरने लग्न करण्यास नकार देताच रियाने बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे समीर याने तिची समजूत घातली. महिलेने तक्रार दिली नाही. त्यानंतर समीर याने विष प्राशन केले. नातेवाइकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पीडित महिला त्याला भेटायला गेली. यावेळी समीर याचा भाऊ व मित्राने पीडित महिलेला शिवीगाळ केली.