esakal | बुटीबोरीतील स्नेहल फार्मा कंपनीला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान; जीवितहानी नाही 

बोलून बातमी शोधा

Fire at Snehal Farma company in butibori Nagpur

प्राप्त माहितीनुसार इंडोरामा नजीकच्या स्नेहल फार्मा या कंपनीमध्ये औषधांची निर्मिती केली जाते. सकाळी सर्व कामगार कंपनीच्या आत प्रवेश केल्यानंतर कामामध्ये मग्न असताना

बुटीबोरीतील स्नेहल फार्मा कंपनीला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान; जीवितहानी नाही 
sakal_logo
By
नितीन पुरोहित

बुट्टीबोरी (जि. नागपूर) :  बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील इंडोरामा नजीकच्या स्नेहल फार्मा या कंपनीला सोमवारी (ता.१) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.

हेही वाचा - कोरोनानंतर आता इंधन वाढीचा जबर फटका; महिलांचं बिघडलं आर्थिक गणित; कुटुंबात तणावही वाढला  

प्राप्त माहितीनुसार इंडोरामा नजीकच्या स्नेहल फार्मा या कंपनीमध्ये औषधांची निर्मिती केली जाते. सकाळी सर्व कामगार कंपनीच्या आत प्रवेश केल्यानंतर कामामध्ये मग्न असताना सकाळी १०.३० च्या सुमारास या कंपनीत भीषण आग लागल्याची वार्ता कामगाराच्या कानी पडताच जीव मुठीत घेऊन सर्वांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. 

पाहता पाहता या आगीने उग्र रूप धारण केले. तिथे असलेल्या वेस्टेज सामानाला (खर्डा, प्लास्टिकला) आग लागताच आग वाढत गेली. आग विझविण्यासाठी तत्काळ अग्निशमनला बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात आले. जवळपास तीन तासानंतर या भीषण आगीला विझविण्यात अग्निशमन दलास यश प्राप्त झाले.

हेही वाचा -ऑनलाइन प्रणाली ठरतेय डोकेदुखी; १५ दिवसांनंतरही मिळत नाही दाखले

आग लागण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे हा अपघात घडला असावा अशी चर्चा  होत आहे. परिसरात सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झालेले असता या भीषण आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून कंपनीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचा नेमका आकडा अजून कळायचा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ