धोक्याचा इशारा : दुबई रिटर्न ५ तरुण कोरोनाबाधित

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉननं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Coronavirus
Coronavirusesakal
Summary

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉननं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे.

नागपूर - कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉननं (Omicron) सर्वांचीच चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटमुळे (Varient) भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यातच पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येने अचानक उसळी घेतली. दुबई रिटर्न असलेल्या पाच तरुणांना (Youth) कोरोनाची बाधा झाल्याने ओमिक्रॉन संशयितांची संख्या वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेले कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. रविवारी (ता.२६) २४ तासांमध्ये चक्के ३२ जण बाधित आढळून आले आहेत.

केंद्र शासनाच्या निर्देशावरुन राज्य शासनाने पुन्हा निर्बंध कठोर केले. त्यातच आता नागपूर जिल्ह्यातही दैनंदिन रुग्णसंख्येने चांगलीच उसळी घेतली आहे. शनिवारी (२५) २४ तासामध्ये २४जण बाधित आढळले. यानंतर दुसऱ्याच दिवशी ३५ चा आकडा पार झाला. यामुळे प्रशासनाची चिंताही वाढली आहे. दुबई येथून परतलेले ५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ही बाबत प्रशासनासोबतच नागपुरकरांच्याही चिंतेत भर घालणारी ठरत आहे. सर्वांना कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनची तर बाधा झालेली नाही ना? याची तपासणी करण्यासाठी त्यांचे नमुने पुण्याचा राष्ट्रीय विषाणऊ प्रयोगशाळेकडे जनुकिय चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

Coronavirus
भारतातून दिसणार दोन ग्रहणे; वर्षभरात १९ वेळा धूमकेतू पाहता येणार

ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता परदेशातुन परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विमानतळावर कोविड चाचणी करण्यात येते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर महापालिकेकडून प्रवाशांची कोविड तपासणी होते. रविवारी ५ जण कोरोनाबाधित आढळले. शहरातील मानेवाडा परिसरातील १९ वर्षीय तरुण, मोतीबाग येथील १८ वर्षीय तरुण, कामठी येथील ३१ वर्षीय तरुण, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील २८ वर्षीय तरुण तसेच ब्रम्हपूरी येथील ३६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. हे पाचही जण रविवारला दुबईतील शारजा येथून थेट विमानाने नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले.

विमानतळावरील कोविड चाचणीत ते बाधित आले. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता जिनोम सिक्वेंसिंगकरिता पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल पुढील आठवड्यापर्यंत येणे अपेक्षित आहेत. त्यानंतरच यांना नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनची की कोविडच्या डेल्टा, डेल्टा प्लस या विषाणूची बाधा झाली आहे हे स्पष्ट होणार आहे. या सर्वांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) येथे डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहेत.

नव्याने ३२ कोरोनाबाधित

जिल्ह्यात ३ हजार ३०५ कोरोना चाचण्यांमध्ये रविवारी (ता.२६) ३२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. यात २७ जण शहरातील आहेत. तर २ज ग्रामीण भागातील आहेत, उर्वरित ३ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. अचानक कोरोनाच्या संख्येने उसळी घेतली. यामुळे जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या शतकपार झाली आहे. १०४ कोरोनाबाधित नागपुरात आहेत. यामुळे पुन्हा एकदा चिंताजनक स्थिती निर्माण होण्याची भिती आहे. ७जणानी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आता ४ लाख ९३ हजार ८४८ व्यक्तीना कोरोना झाला. यातील ४ लाख ८३ हजार ६२२ जणांनी कोरोनावर मात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com