esakal | ‘काळ’वार : कोणी गमावले पिता-पुत्राला तर कोणी मुलांना; आई रागावल्याने केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

four people died in various accidents

आई रागावल्याने मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडीतील घरकुल सोसायटी येथे घडली. पोरस शंकर क्षीरसागर (वय १५) असे मृताचे नाव आहे. पोरस हा पंडित बच्छराज व्यास शाळेत दहाव्या वर्गात शिकत होता.

‘काळ’वार : कोणी गमावले पिता-पुत्राला तर कोणी मुलांना; आई रागावल्याने केली आत्महत्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : घराबाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत कुणाच्या जिवाची गॅरंटी नसते. अपघातात कुणाचा जीव जाईल हे सांगता येत नाही. अशाच अपघातात पिता-पुत्राला जीव गमवावा लागला. तर एका अपघातात कारने मुलाला चिरडले. आई रागावल्याने मुलाने आत्महत्याच केली. यामुळे मुलांना रागावणेही आता जिवावर बेतू शकते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा रबडीवाला टी पॉईंट येथे सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात पितापुत्र दुचाकीला झालेल्या अपघातात ठार झाल्याची घटना घडली. तालुक्यातील निहारवानी येथील निवासी सिध्दार्थ बोंबले (वय ४५) व मुलगा सुनील बोंबले (वय ११) वर्ष हे दुचाकीने भंडाऱ्याकडून नागपूरकडे जात होते.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

रबडीवाला टी पॉईंटजवळ मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. मौदा पोलिस पुढील तपास करीत आहेत. महामार्ग क्र. सहा येथून वेगवान ‘फोर वे’वर बेधडक वाहने चालत असतात. त्यातच भंडाऱ्याकडून मौद्याला येणाऱ्या वाहनांच्या नेहमीच रांगा लागलेल्या असतात.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

हाच रस्ता जबलपूर रस्ता आहे. त्यामुळे मोठे वाहने या टी पाइंटवरून वळत असतात. त्यामुळे येथे नेहमी अपघात होत असतात. येथून २०१४ पासून उड्डाणपुलाची नेहमी मागणी होत आहे. अजून किती लोकांचे जीव जाणार? परंतु शासनाचे डोळे उघडत नाहीत, अशी तदुदक्रार ग्रामस्थ करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत भरधाव कारने रितेश श्रीकृष्ण पलांदुरे (वय १५, रा. माँ शारदानगर) या मुलाला चिरडले. ही घटना बहादुरा भागात रविवारी सायंकाळी घडली. रितेश याचे नातेवाईक रितेश चंद्रकांत चौरे (वय ३६, रा. सोमवारी क्वॉटर्र) हे बहादुरा फाट्यावर आले. येथून ते रितेशच्या घरी जात होते. मात्र, तेथे जाण्यासाठी वाहन नव्हते.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

यामुळे त्यांनी रितेशला फोन केला. रितेश हा मोपेड घेऊन बहादुरा फाटा येथे आला. दोघेही माँ शारदानगरकडे जात होते. दरम्यान, चौरे यांनी लघुशंकेसाठी मोपेड थांबवली. रितेश मोपेडवरच बसला होता. दरम्यान, रितेश मोपेडसह खाली पडला. याच वेळी मागून आलेल्या कारने त्याला धडक दिली. मेडिकलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सक्करदरा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तिसऱ्या घटनेत आई रागावल्याने मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडीतील घरकुल सोसायटी येथे घडली. पोरस शंकर क्षीरसागर (वय १५) असे मृताचे नाव आहे. पोरस हा पंडित बच्छराज व्यास शाळेत दहाव्या वर्गात शिकत होता. रविवारी सायंकाळी पाणी सांडल्याने आईने त्याला रागावले.

सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

त्याचा विपरित परिणाम पोरसच्या मनावर झाला. त्याने विष प्राशन केले. प्रकृती खालावल्याने नातेवाइकांनी त्याला ओंकारनगरमधील श्रीसाई कृपा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top