esakal | कुख्यात गुंडाच्या तब्बल सात शाळा, गुन्हेगारीच्या पैशातून उघडल्या शिक्षण संस्था
sakal

बोलून बातमी शोधा

ranjeet safelkar

कुख्यात गुंडाच्या तब्बल सात शाळा, गुन्हेगारीच्या पैशातून उघडल्या शिक्षण संस्था

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : सुपारी किलर आणि गॅंगस्टर रणजित सफेलकर याने गुन्हेगारीतून कमावलेल्या पैशातून चक्क शैक्षणिक संस्था काढल्या. त्याने सात शाळा उघडल्या असून काही शाळा शंभर टक्के अनुदानित आहेत. त्या शाळांतून विद्यार्थी घडवायचे होते की गुंड याबाबत शंका आहे.

राज्यातील बहुचर्चित आर्किटेक एकनाथ निमगडे, मनीष श्रीवास हत्याकांडांसह सात खुनांच्या गुन्ह्याचा रणजित सफेलकर मास्टर माईंड आहे. सफेलकर फक्त तिसरा वर्ग नापास आहे. शिक्षणाचा गंध नसल्यामुळे तो गुन्हेगारी जगतात आला. गुन्हेगारी जगतात पापाची कमाई केली. त्या कमाईतून त्याने तीन शिक्षण संस्थांच्या अध्यक्षांना दमदाटी करीत संस्था बळकावल्या. सध्या तो सात शाळा संचालित करत असलेल्या तीन शैक्षणिक संस्थांचा अध्यक्ष आहे. सफेलकरने जसे जीवे मारण्याची धमकी देऊन भूखंड बळकावले त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांही बळकावल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - तूरसह हरभरा डाळीच्या दरात वाढ, साखरही महागणार

पाच कोटी रुपयांची सुपारी घेऊन त्याने एकनाथ निमगडे याचे हत्याकांड घडवले. त्या हत्याकांडाचा तपास सीबीआय करीत आहे. दुसरीकडे नऊ वर्षांपूर्वी झालेल्या मनीष श्रीवास हत्याकांडात नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या स्वरूपाचे २० गंभीर गुन्हे दाखल आहेत. राजकीय वरदहस्तामुळे आजवर त्याच्याविरुद्ध कारवाई होत नव्हती. आता त्याने केलेले एक एक गुन्हे समोर येत असून आतापर्यंत त्याच्याविरुद्ध खुनाचे सात गुन्हे दाखल आहेत. आठवा खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून कायदेशीर प्रयत्न सुरू आहेत. तिसरी नापास सफेलकर हा कामठी नगरपरिषदेचा उपाध्यक्ष होता. आता पोलिस तपासात तो सात शाळा संचालित करणाऱ्या तीन शिक्षण संस्थांचा अध्यक्ष असल्याची बाब उजेडात आली आहे. कुख्यात गुंड जर शाळा काढत असेल तर तेथील विद्यार्थ्यांचे भविष्य आजच अंधारात आहे.

हेही वाचा - पर्यटकांनो! आजपासून ताडोबा 'या' दिवसापर्यंत राहणार बंद

गुंडाच्या शिक्षण संस्था आणि शाळा -

सफेलकर हा आदिम जाती जमाती बहुउद्देशीय संस्थेद्वारा ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय, स्व. छापृजी बाविस्कर कनिष्ठ कला महाविद्यालय पावणगाव, शांती तुलसी इंग्लिश मीडियम स्कूल भरतवाडा, भवानी माता उच्च प्राथमिक शाळा भरतवाडा आणि संत वियोगी महाराज हिंदी प्राथमिक शाळा भरतवाडा मार्ग, कळमना या शाळा संचालित होतात. सुखाशा एज्युकेशन अ‍ॅण्ड मल्टीपर्पज सोसायटीद्वारा गुरुकुल इंडियन ऑलम्पीयार्ड स्कूल ऑफ स्कॉलर्स पुनापूर आणि पब्लिक एज्युकेशन सोसायटीद्वारा राष्ट्रीय हिंदी मराठा प्राथमिक शाळा रमानगर, कामठी येथे हिंदी व मराठी शाळा संचालित करण्यात येतात. या संस्थांचा सफेलकर अध्यक्ष आहे.

हेही वाचा - कोरोनाबाधितांचा कधी घरी, तर कधी अ‌‌ॅम्बुलन्समध्येच मृत्यू; महापालिका फक्त शव उचलण्याच्या कामाची

loading image
go to top