शासकीय कर्मचाऱ्याची पार्टी ठरली सोशल मीडियावर चर्चेचा विषय, हे आहे कारण...

Government employees give the party during office hours
Government employees give the party during office hours

नागपूर : वाढदिवस म्हटलं की प्रत्येकासाठी स्पेशल दिवस... या दिवशी काही तरी वेगळे वाटते... सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येते. शुभेच्छा देताना पार्टीची मागणी केली जाते. "भाऊ... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... पार्टी तो बनती है ना...' असे मॅसेच पाठवून पार्टीची मागणी केली जाते. अनेकजण हो... हो... म्हणून वेळ मारून नेतात तर अनेक जण पार्टीचे आयोजन करतात. पार्टी देऊन ते आपला आनंद साजरा करतात. अशीच एक पार्टी नागपुरात झाली. सध्या तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. 

जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाली एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस... सहकारी कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देत पार्टीची मागणी केली. कर्मचाऱ्यांनीच पार्टी मागितल्याने नकार देणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे पार्टीचे आयोजन करण्याचे ठरले. कार्यालयात असल्याने पार्टी करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे पार्टी कधी करायची असा प्रश्‍न पटला. पार्टी आजच करायची असल्याने कार्यालयातच आयोजन करण्याचे ठरले.

कार्यालयीन वेळेतच पार्टीचे आयोजन करून सहकाऱ्यांना जवेण देण्यात आले. कामाच्या वेळेत वाढदिवस साजरा झाल्याने कामावर परिणाम झाला. बराच वेळ वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात काम करण्याबाबतचे नियम व कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. त्याचे पालन न करणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे. परंतु, जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुठल्याच प्रकारचा धाक, भीती नसल्याचे यावरून दिसून येते. यामुळे कामानिमित्त कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. 

पार्टीला विभागप्रमुखांची सहमती!

शासनाने पाच दिवसांचा आठवडा करताना कामाचे तास निश्‍चित केले आहे. तसेच जेवणाची वेळ ही निश्‍चित केली आहे. यानुसार जेवणासाठी फक्त अर्धातास आहेत. परंतु, येथे जेवणाचा कार्यक्रम तासंतास सुरू असल्याचे सांगण्यात आले. विभागप्रमुखांच्या सहमतीनेच हा सर्व प्रकार घडल्याची चर्चा आहे.

दोन वर्षांपूर्वी विना परवानगी विदेशवारी

दोन वर्षांपूर्वी दहा कर्मचारी विना परवानगी विदेशवारी करून आले होते. सोशल मीडियावर त्याचे व्हीडिओ व्हायरल झाले. तत्कालीन सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्वांवर निलंबनाची कारवाई केली होती. कार्यालयीन वेळेत, कार्यालयात विना परवानगी अशा प्रकारच्या पार्टीचे आयोजन करणे शिस्तभंग असल्याचे जाणकारांचे मत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com