Speeding Car Crash Leaves Two Dead, Eight Seriously Injured
Sakal
नागपूर
हृदय पिळवटणारी घटना! मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची धडक; दोन महिला ठार, आठ गंभीर जखमी, किंकाळ्या अन् काय घडलं..
Police investigation into Deadly Road Accident: लोणारमध्ये भीषण अपघात: मजुरांच्या ऑटोला कारची धडक, दोन महिलांचा मृत्यू
लोणार: नेट शेड हाउसकडे जात असलेल्या मजुरांच्या ऑटोला भरधाव कारने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी(ता. १ ) रोजी लोणार ते सरस्वती रस्त्यावर सकाळी आठ वाजता घडली. जरीनाबी आयुब शाहा (वय ४५) रा. किनगाव जट्टू व रंजना परमेश्वर कासतोडे (वय ५३) अशी मृत महिलांची नावे आहेत.

