esakal | 'विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, अर्णब गोस्वामी प्रकरणात रितसर चौकशी सुरू'
sakal

बोलून बातमी शोधा

home minister anil deshmukh criticized devendra fadanavis in nagpur

विरोधी पक्षाने विरोधकांची भूमिका योग्य पद्धतीने वठवणे अपेक्षित आहे. पण सरकारवर टीका करण्यातच ते आपला सर्व वेळ आणि शक्ती खर्ची घालत आहेत, अशी टीकाही देशमुखांनी केली.

'विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, अर्णब गोस्वामी प्रकरणात रितसर चौकशी सुरू'

sakal_logo
By
अतुल मेहेरे

नागपूर :  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य नाही. अर्णब गोस्वामी प्रकरणात आमची चौकशी सुरू आहे आणि रीतसर न्यायालयाची परवानगी घेऊन चौकशी केली जात आहे. जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. लवकरच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किंवा मी कुणाचीही माफी मागण्याची आवश्‍यकता नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. आज ते पत्रकारांशी बोलत होते. 

हेही वाचा - चांदूर बाजार नगरपालिकेची पोटनिवडणूक, भाजपचा पराभव करत पालिकेवर प्रहारचा झेंडा

देशमुख म्हणाले, चौकशीच्या बाबतीत कुठलीही आडकाठी नाही. अर्णब गोस्वामी यांनी अन्वय नाईक यांचे ८० लाख रुपये दिले नाही. त्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. मागच्या सरकारने चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण दाबले होते. या प्रकरणाची फाईल आम्ही उघडली असून चौकशी सुरू आहे. कंगणा राणावतच्या बाबतीत राज्य सरकारचा काही संबंध नाही. कारण त्यांच्या घराचे अतिक्रमण पाडण्याची कारवाई मुंबई महापालिकेने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला जी मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी राज्याचा प्रमुख म्हणून आपली भूमिका मांडली आहे. विरोधी पक्षाने विरोधकांची भूमिका योग्य पद्धतीने वठवणे अपेक्षित आहे. पण सरकारवर टीका करण्यातच ते आपला सर्व वेळ आणि शक्ती खर्ची घालत आहेत, अशी टीकाही देशमुखांनी केली.

हेही वाचा - महाविकास आघाडी हे राजकीय अल्झायमर झालेले सरकार - मुनगंटीवार

कोरोनाचा लढा राज्य शासन योग्य पद्धतीने लढत आहे. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री होते. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना विनंती केली की, या कोरोनाच्या काळात तुम्ही सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र बोलवा. तुमच्या पक्षाच्या महाराष्ट्रातील मंडळींनाही समज द्या. अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, हे त्यांना समजावून सांगा. कोरोनाच्या लढ्यात सरकार चांगले काम करीत असताना विरोधी पक्ष केवळ चुका काढण्याचे काम करत आहे. या स्थितीत विरोधी पक्षाने सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज असल्याचे देशमुख म्हणाले.