
हॉटेल, रेस्टॉरन्टचा व्यवसाय निम्यावर
नागपूर : लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याचे कारण पुढे करून कोरोनाचे निर्बंध अद्यापही उपराजधानीत शिथिल करण्यात आले नाहीत. त्यामुळे खवय्यांनी हॉटेल, रेस्टॉरंटकडे पाठ फिरवल्याने निम्मा व्यवसाय ठप्प झाला आहे. मुंबई आणि पुणे येथे हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ वाढवण्यात आली. मात्र, नागपुरात दहा वाजेपर्यंतच बंधन कायम आहे. प्रशासनाचा मापदंडाचा व्यापाऱ्याना फटका बसत असून हजारो रोजगार संकटात आले आहेत.
कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर शासनाने निर्बंध जाहीर केले. त्यामुळे रुळावर आलेला हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला. वाढलेल्या रुग्णांमुळे सुरक्षेच्या दृष्टीने व्यापाऱ्यांकडून सहकार्य करण्यात आले. मात्र, आता परिस्थिती सामान्य झालेली असताना प्रशासकीय उदासीनतेमुळे निर्बंध कायम आहेत. कोरोना पूर्णत: नियंत्रणात आला असून दररोज रुग्णांची संख्याही कमी होत आहे. परंतु, प्रशासनाने लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याचे कारण पुढे करून निर्बंध शिथिल केलेले नाहीत. पुणे आणि मुंबई येथील मनपा आयुक्तांनी लसीकरण टक्केवारीच्या आधारे रेस्टॉरंट आणि हॉटेल रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.
हेही वाचा: 'दोन कॅबिनेट मंत्री आणि मध्यवर्ती निवडणुका..', राऊतांच्या पत्राने खळबळ
नागपुरात अद्यापही दहा वाजेपर्यंतच या व्यवसायाला परवानगी आहे. शहराच्या बाहेरील धाबे मात्र, रात्री उशिरापर्यंत सुरु असतात. मग शहरातच रात्री दहा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे कारण काय. रात्री दहानंतरच कोरोना वाढतो का असाही सवालही उपस्थित केला जात आहे.
आमच्या व्यवसायाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. हा व्यवसाय संपविण्याचे षडयंत्रच असल्याचा आरोपही केला जात आहे. रात्री दहा वाजेपर्यंत केवळ ४० ते ५० टक्के व्यवसाय होऊ शकतो. हा उद्योग रात्री नऊ वाजेनंतर सुरू होऊन रात्री १२ वाजेपर्यंत चालतो, परंतु अधिकाऱ्यांकडून याकडे गांभीर्याने लक्षच देत नाही.
हेही वाचा: डिसले गुरुजींकडून अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची घोषणा
बंद करताना जी तत्परता दाखविली जाते तशीच तत्परता सुरु करण्यासाठीही केली जावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. बंद आणि सुरुच्या या प्रकरामुळे हॉटेल उद्योजक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दररोज या इंडस्ट्रीजला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे.
"कमी वेळ असल्याने खवय्यांनी हॉटेलकडे पाठ फिरवलेली आहे. पुणे- मुंबईच्या धर्तीवर निर्णय घ्यावा आणि आमच्या उद्योगाला सुगीचे दिवस आणावे. कोरोना रुग्ण कमी झाले असून परिस्थितीही नियंत्रणात आहे. तरीही निर्बंध शिथिल करण्यात येत नाही हे न उलगडणारे कोडे आहे."
- मनदीपसिंग पद्म, नागपूर इटरी ओनर्स असोसिएशन.
Web Title: Hotel Restaurant Business At Half Restriction On Vaccination Percentage Restriction
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..