

Nagpur’s Gaurav Shende, whose selfless organ donation gave new life to three patients.
sakal
नागपूर: गौरव रमेश शेंडे या २६ वर्षीय तरुणाचा मेंदुमृत झाला. त्याने मृत्यूला कवटाळताना तीन जणांना जीवनदान दिले. गौरवच्या दोन किडनी दोन जणांना तर यकृताचे एकाला प्रत्यारोपण करण्यात आले. उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) यंदाच्या वर्षातील पहिले अवयवदान यशस्वीरीत्या पार पडले. गौरवच्या कुटुंबियांनी घेतलेल्या मानवीय व प्रेरणादायी निर्णयामुळे तीन गंभीर आजारी रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे.