Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

नागपुरातील १९ वर्षीय विद्यार्थिनीने ‘पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही’ असे सुसाईड नोटमध्ये लिहून संपविले जीवन.
sneha chaturvedi

sneha chaturvedi

sakal

Updated on

नागपूर - वैद्यकीय प्रवेशासाठी ३ मे रोजी घेण्यात आलेल्या ‘नीट’मधील पेपर फुटला. त्यामुळे २१ जूनला फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण असून याच तणावातून नागपुरातील १९ वर्षीय विद्यार्थिनीने ‘पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही’ असे सुसाईड नोटमध्ये लिहून आत्महत्या केली. ही घटना २० मे रोजी पांढराबोडी परिसरातील अजयनगरात उघडकीस आली. विशेष म्हणजे, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर या संदर्भात माहिती देत, विद्यार्थ्यांच्या परिस्थिती मांडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com