esakal | उपराजधानीत दोनशेवर डेंगीग्रस्तांची नोंद; लहान मुलांना विळखा
sakal

बोलून बातमी शोधा

उपराजधानीत दोनशेवर डेंगीग्रस्तांची नोंद; लहान मुलांना विळखा

कोरोना ओसरल्यानंतर फवारणीपासून तर डेंगी अळ्यांची शोधमोहीम सुरू केली नाही. यामुळे अचानक डेंगीचा उद्रेक वाढला.

उपराजधानीत दोनशेवर डेंगीग्रस्तांची नोंद; लहान मुलांना विळखा

sakal_logo
By
केवल जीवनतारे ः सकाळ वृत्तसेवा

नागपूर: कोरोना (corona) विषाणूच्या प्रकोपामुळे इतर आजारांकडे आरोग्य विभागाचे (Department of Health) लक्ष गेले नाही. कोरोना ओसरल्यानंतर फवारणीपासून तर डेंगी अळ्यांची शोधमोहीम सुरू केली नाही. यामुळे अचानक डेंगीचा (Dengue) उद्रेक वाढला. सध्या मेडिकल, मेयोत कोरोना रुग्णांपेक्षा डेंगीमुळे भरती असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. लहान मुलांना डेंगीने मोठ्या संख्येने विळख्यात घेतले आहे. दोन आठवड्यात उपराजधानीत डेंगीच्या दोनशेवर डेंगीग्रस्तांची नोंद झाली. मेडिकलमध्ये १२ तर मेयोत १० डेंगीग्रस्त उपचारासाठी दाखल आहेत. विशेष असे की, महापालिकेच्या नोंदीत डेंगीने आतापर्यंत ३ जण दगावल्याची नोंद आहे.

हेही वाचा: डॉक्टरांनी पत्र देऊन दुसऱ्यांदा मागितली आत्महत्येची परवानगी

शहरात डेंगी अचानक वाढल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. वर्षभरापासून डास निर्मूलनाची मोहीम थंडबस्त्यात असल्याने डेंगीच्या अळ्यानियंत्रणासाठी कोणताही उपाययोजना केली नाही. परिणामी दोन आठवड्यात २०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद उपराजधानीत झाली आहे. डेंगीवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. यामुळे डासांच्या उत्पत्तीवरच नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेतर्फे डासांच्या अळ्या शोध मोहीम राबवण्यात येते.

हेही वाचा: मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला घेतलं कामावर; नागपूर मनपाचा कारभार

या सर्वेक्षणात दूषित घरांवर कारवाई करण्यात येते, मात्र महापालिकेच्या आरोग्य विभाग सुस्त असल्याने याकडे कोणीही लक्ष दिले नाही. डेंगी हा देखील विषाणूजन्य (व्हायरल इन्फेक्शन) आजार आहे. ‘एडिस एजिप्टी’ डासाच्या चावण्याने हा आजार होतो. डेंगीचा एक डास सुमारे १५०० डासाला जन्म घालतो. डेंगीचा डास हा पाच ‘एमएल’ साचलेल्या पाण्यातही अंडी घालतो. यामुळे डेंगी डासांची पैदास झपाट्याने वाढते. परिणामी, डेंगी डासांच्या उत्पत्तीचे केंद्र कुलर ठरतात. याशिवाय, टिन कंटेनर, कुंड्या, नांद, सिमेंटचे टाके, प्लास्टिक व मातीची भांडी, टायर, फुलदाणीमध्येही अळ्या आढळतात. दुसऱ्यांदा डेंगी झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार जास्त गंभीर होतो. मात्र, तरीदेखील आरोग्य विभागावर डास निर्मूलनासाठी प्रभावी अशी यंत्रणा राबवण्यात आली नाही.

हेही वाचा: नागपूर : तरुणाने बाईकसह घेतली तलावात उडी

प्लेटलेटसाठी धावाधाव

डेंगीने थैमान घातल्याने उपराजधानीतील रक्तपेढीत प्लेटलेट्ससाठी रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. डेंगीचे निदान झालेल्या रुग्णाला प्लेटलेट्सची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. काही रुग्णालयांतून प्लेटलेट्ससाठी सक्ती करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे, असे एका नातेवाइकाने सांगितले.

हेही वाचा: नागपूर पोलिसांची प्रतिमा होताहे मलीन! विधवेवर बलात्कार

शहरातील डेंगीग्रस्त

-२०१८-५६५

-२०१९-६३६

-२०२०-१०७

-२०२१ -२०१ (जुलैपर्यंत)

अनियमित पावसामुळे साथीचे आजार वाढत आहे त्यात डेंगीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढला आहे. नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. घरात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. घरातील कुलर्स रिकामे करावे.

-आर विमला, जिल्हाधिकारी, नागपूर.

loading image