esakal | महिला गृह उद्योगाने कसली कंबर, देणार चिनी उत्पादनाला आव्हान; वाचा कुणी घेतला पुढाकार...
sakal

बोलून बातमी शोधा

Indigenous goods will now appear in the domestic market

देशात भारतीय वस्तूंचा तुटवडा जाणवणार नाही. या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देशातील वाहतूकदारांची आघाडीची संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशन किफायत दरात करणार आहे असे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले. 

महिला गृह उद्योगाने कसली कंबर, देणार चिनी उत्पादनाला आव्हान; वाचा कुणी घेतला पुढाकार...

sakal_logo
By
राजेश रामपुरकर

नागपूर : भारत आणि चीन यांच्यात वाढलेल्या तणावामुळे केंद्र सरकारने चिनी बनावटीच्या 59 ऍपवर बंदी घातली आहे. यामुळे कोट्यवधी युजर्सनी हे ऍप डिलेट केले आहेत. एका आघाडीवर यश मिळविल्यानंतर आता अखिल भारतीय व्यापारी महासंघाने चिनी उत्पादकांना झटका देण्यासाठी देशातील विक्रेते सज्ज झाले आहेत. आता त्यांनी भारतीय वस्तूंच्या विक्रीचा संकल्प केला आहे. 

देशात चिनी वस्तूंच्या बहिष्काराची राष्ट्रीय मोहीम राबवित आहे. त्यांनी तीन ऑगस्टच्या राखीपासून ते 25 नोव्हेंबरपर्यंतच्या तुळशी विवाहापर्यंतच्या सर्व सणांमध्ये लागणाऱ्या वस्तू भारतीय बनावटीच्या असाव्यात, असे आवाहन व्यापारी संघटनांना केले आहे. सणांच्या तीन महिन्यांत राखी, जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दुर्गापूजा, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, तुळशी विवाह आदी सण येणार आहेत. प्रत्येक सणात भारतीय वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी कॅटने व्यापक योजना तयार केली आहे. सर्व वस्तूंची यादी तयार करीत आहे. ती 11 जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे.

महत्त्वाची बातमी - तुमचे उत्पन्न एक लाखावर आहे ना, मग पांढरे रेशनकार्ड मस्ट!

राखीपासून दिवाळीपर्यंत येणाऱ्या सर्वच सण भारतीय संस्कृतीनुसार साजरे करण्यात येणार आहेत. यामुळे बाजारात भारतीय बनावटीच्याच वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यातून उद्योजिका आणि महिला गृह उद्योगांना प्रोत्साहन देणार आहे. राखी व राखी धागा, मिठाई, नमकीन महिला तयार करतील. त्याच्या विक्रीची व्यवस्था कॅट करणार आहे. 20 हजार कोटींचा उलाढाल यात होण्याची शक्‍यता आहे. 

सणांशी संबंधित भारतीय वस्तू तयार करणारे निर्माता, कारागीर, लघु उद्योग, कुंभार, महिला उद्योजिका, स्वयंउद्योजक, स्टार्टअप आदींशी संपर्क साधून त्यांना किती प्रमाणात वस्तू तयार करायच्या आहेत. ही माहिती गोळा करण्याचा सल्ला कॅटची राज्यस्तरीय चमू आणि अन्य प्रमुख व्यापारी संघटनांना दिला आहे. दुसरीकडे त्यांच्या राज्यात उपरोक्त वस्तूंची किती विक्री आहे. याचीही माहिती एकत्र करण्यास म्हटले आहे. ही माहिती 15 जुलैपर्यंत तयार होणार आहे, असे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले.

हेही वाचा - 10 ते 12 जुलै पर्यंत 3 दिवस जनता कर्फ्यू, व्यापारी संघटनेचा निर्णय

भारतीय वस्तूंचा तुटवडा जाणवणार नाही

एकत्रित केलेला डेटा कॅटच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात गोळा केला जाईल. दोन्ही डेटाच्या आधारावर कोणत्या राज्यात किती वस्तू तयार होत आहेत आणि त्यांची राज्यात किती विक्री आहे, हे वगळता उर्वरित वस्तू कोणत्या राज्यात पाठविले पाहिजेत याची विस्तृत माहिती गोळा होईल. त्यामुळे देशात मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ साधला जाईल. तसेच देशात भारतीय वस्तूंचा तुटवडा जाणवणार नाही. या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देशातील वाहतूकदारांची आघाडीची संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशन किफायत दरात करणार आहे असे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले. 

संपादन - नीलेश डाखोरे 

loading image
go to top