esakal | कोरोनाचा आघात फुफ्फुसावर नव्हे तर या अवयवांवरही; वाचा काय सांगतात डॉ. अविनाश गावंडे
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा आघात फुफ्फुसासोबतच या अवयवांवरही! जाणवतोय त्रास

कोरोनाचा आघात फुफ्फुसासोबतच या अवयवांवरही! जाणवतोय त्रास

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : नागपुरात कोरोनाच्या दुसऱ्या (coronavirus) लाटेचा प्रकोप जवळपास ओसरला आहे. मात्र, पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. पॉझिटिव्ह रुग्ण कमी झाले असून, मृतांची संख्या चांगलीच आटोक्यात आली आहे. यामुळे शहरातील नागरिक चांगलेच निश्चितं झाले आहेत. दुसरीकडे कोरोनातून बाहेर पडलेल्या नागरिकांना आता विविध आजारांचा सामना (Coping with various ailments) करावा लागत आहे. कोरोनाने थेट फुप्फुसांवर आघात केला असला तरी तो शरीरातील इतरही अवयवांना आता नुकसान (Damage to other organs in the body) पोहोचू लागला आहे. कोरोना विषाणूमुळे क्लॉटिंग सुरू होऊन आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या आहेत. (Injury-to-the-lungs-as-well-as-other-organs-by-corona-virus)

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण भरती होते. यातील अनेक रुग्णांचे फुप्फुस ९० टक्क्यांपर्यंत खराब झाले होते. एकंदरीत ते मरणाच्या दारात पोहोचले होते. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या मेहनतीमुळे अनेकांनी कोरोनावर मात केली. आता ते सामान्य जीवन जगत आहे.

हेही वाचा: चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

मात्र, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे आता पुढे येत आहे. कोरोना विषाणू केवळ फुफ्फुसालाच प्रभावित करीत नाही तर ब्रेन, हृदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंडावरही आघात करीत असल्याचे समोर येत आहे. यामुळे शरीरातील या अवयवांमध्ये क्लॉटिंग तयार होऊ लागते आहेत. याला थ्रोंबोसिसही म्हटले जाते. ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तसेच अवयवांना काम करण्यातही समस्या निर्माण होते.

अशाप्रकारचे अनेक रुग्ण मेडिकलमध्ये आले. ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे इतर आजारानेही ग्रस्त होते. त्यांना पूर्वीपासून रक्तदाब, हायपरटेंशन, मधुमेह आदी आजारांनी ग्रासले होते. यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. याशिवाय काही सामान्य व कमी वयोगटाच्या रुग्णांमध्येही या समस्या दिसून आल्या आहेत.

मेडिकलमध्ये कमांडोचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी मेडिकलमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलातील कमांडोचा मृत्यूही याचप्रकारे झाला. रुग्णाचे वय अवघे २५ ते २८ वर्ष होते. तो कोरोनाने बाधित झाला होता. दोन महिन्यांनंतर त्याला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या जाणवू लागल्या होत्या. यामुळे त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा: लग्नघरातच संपूर्ण कुटुंबाचा अंत; हळदही न निघालेल्या दाम्पत्याचाही मृत्यू

कोरोना फुफ्फुसासोबतच हृदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंडावरही आघात करतो. या प्रकारचे रुग्ण मेडिकलमध्ये आले आहे. या रुग्णांची संख्या कमी असली तरी याचा प्रभाव हा कोरोनातून बरे झाल्यानंतर होत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांना अवयवाशी संबंधित समस्या होत असते. तेव्हा याचे निदान होत आहे.
- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल हॉस्पिटल

(Injury-to-the-lungs-as-well-as-other-organs-by-corona-virus)

loading image