जेईई-ॲडव्हान्समध्ये ऋषभ गहरवार विदर्भातून प्रथम

JEE-Advance
JEE-AdvanceJEE-Advance

नागपूर : आयआयटी खरगपूरद्वारे घेण्यात आलेल्या आयआयटी जेईई ॲडव्हान्सच्या निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आला. या निकालात ‘एलन’ ॲकेडमीच्या ऋषभ गहरवार याने अखिल भारतीय गुणवत्ता यादीत ११० व्या रॅंकसह विदर्भातून प्रथम स्थान पटकाविले असल्याची माहिती केंद्रप्रमुख आशुतोष हिसारीया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

आशुतोष हिसारीया म्हणाले, दोन वर्षांपासून एलन ॲकेडमी नागपुरात सुरू करण्यात आली आहे. मात्र, पहिल्याच वर्षी ‘एलन’ने आयआयटी मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षेत चांगला निकाल दिला आहे. दुसऱ्याच वर्षी विद्यार्थ्यांनी विदर्भात टॉप केले आहे. त्यांच्यासोबत आयुष श्रीवास्तव ४७२, पार्थ कस्तुरे ५९३, जयंत धर्माले ७४७, विवेक भोजवानी ८२० यांनीही स्थान पटकाविले आहे.

देशात एक नामांकित आयआयटी, नीट आणि इतर स्पर्धा परीक्षेचे सर्वोत्तम कोचिंग देण्याचे काम ‘एलन’ करते. त्यातूनच पहिल्या टॉप १५ मधील ७. टॉप ५० मधील २७ तर टॉप १०० मधील ४९ विद्यार्थी एलन इंस्टिट्यूटचे आहेत. ऋषभला आयआयटी मुंबई येथून कॉम्प्युटर सायंस शाखेत अभियांत्रिकी करावयाचे आहे.

JEE-Advance
स्वच्छतेतून ५४ टक्के सामान्य आजारांवर नियंत्रण

‘आयकॅड’चे तीन विद्यार्थीही चमकले

आयआयटी जेईई ॲडव्हान्सच्या निकालात आयकॅडच्या रैवत बापट याने ३२५ वा रॅक पटकाविला. याशिवाय इफ्रा खान हिने ८७४ तर चिन्मय भुसारीने २०२ वा रॅक पटकाविला. याशिवाय संस्थेचे ७ विद्यार्थी २ हजार रॅंकमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com