स्वच्छतेतून ५४ टक्के सामान्य आजारांवर नियंत्रण

Hygiene
HygieneHygiene

नागपूर : युनिसेफच्या एका अभ्यास अहवालातील निष्कर्ष सांगतात की केवळ स्वच्छता संदर्भात अनुकूल वर्तनाच्या माध्यमातून जवळपास ५४ टक्के सामान्य आजारांवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. केवळ महत्त्वाच्या वेळी हात स्वच्छ धुण्यामुळे डायरियासारख्या रोगाचे प्रमाण ३० ते ४८ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. श्वसनसंस्था संबंधी २० टक्के आजारांवर नियंत्रण आणता येते. कॉलरा, इबोला, सार्स अशा रोगांचे प्रमाणदेखील कमी होऊ शकते.

शौचालयाचा नियमित वापर, सर्व महत्त्वाच्या वेळी साबण आणि पाण्याने हात धुणे, पिण्यासाठी सुरक्षित आणि शुद्ध पाण्याचा वापर अशा स्वच्छता सवयींचा समाजाने स्वीकार केला, की सामान्य आजारांचे जवळपास अर्ध्याहून अधिक ओझे हलके होते. म्हणजेच माणसांचे कामाचे दिवस वाढतात. आजारामुळे उत्पन्न बुडण्याचे प्रमाण घटते. शिक्षणात सातत्य राहते. वैद्यकीय सेवांवरचा ताण कमी होऊन त्या अधिक कार्यक्षम होतात. मानसिक स्वास्थ्य सुधारते. परिणामी समाज विकासाच्या वाटेवर दोन पावले अधिक टाकायला सिद्ध होतो. अर्थात, हे सगळे जुळून यायला गरज असते ती समाजाच्या सर्व स्तरात स्वच्छता विषयक अनुकूल वर्तनाची.

Hygiene
‘मम्मी-पप्पा, सॉरी मी आत्महत्या करतेय’ मुलीने लावला गळफास

ज्या कामातून हातावर विषाणू, जीवाणू आणि घाण स्थिरावण्याची शक्यता असते, असे प्रत्येक काम केल्यावर साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुतले की अनेक जीवघेण्या संसर्गापासून स्वत:चे रक्षण करता येते. अगदी कोरोनासारख्या संसर्गाची शक्यता आपण हात नेहमी स्वच्छ ठेवून ३६ टक्क्याने कमी करू शकतो, असे संशोधनदेखील समोर आले आहे.

६० टक्के कुटुंबांकडे हात स्वच्छ धुण्यासाठी पर्याप्त पाणी

भारतातील हात स्वच्छ धुण्याच्या संदर्भात 'नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-४'च्या निष्कर्षानुसार देशात केवळ ६० टक्के कुटुंबांकडे हात स्वच्छ धुण्यासाठी पर्याप्त पाणी आणि साबण उपलब्ध आहे. ग्रामीण भागात हेच प्रमाण केवळ ४९ टक्के इतके आहे. संसर्ग टाळण्यासाठी जेवणापूर्वी हात धुणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि 'नॅशनल सॅम्पल सर्व्हे २०१८' नुसार, भारतात जेवणापूर्वी हात धुणाऱ्यांचे प्रमाण ३६ टक्के असून, हे प्रमाण शहरी भागात ५६ टक्के आणि ग्रामीण भागात २५ टक्के इतकेच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com