
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील महेंद्री या प्रस्तावित अभयारण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव वन विभागाने सादर केला. त्याला वन्यजीव प्रेमी मंडळाच्या सदस्यांनी विरोध केला
`कन्हाळगाव' अभयारण्य जाहीर; राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय
नागपूर ः चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर आणि गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्याला आज झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हे राज्यातील ५० वे अभयारण्य झाले असून पश्चिम महाराष्ट्रातील आठ संवर्धन राखीव क्षेत्राला मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील महेंद्री या प्रस्तावित अभयारण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव वन विभागाने सादर केला. त्याला वन्यजीव प्रेमी मंडळाच्या सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी वन विभागाला महेंद्रीचा अभयारण्याचा प्रस्ताव सादर करा. त्या भागातील नागरिकांचा विरोध कसा कमी करता येईल त्याचा अभ्यास करा.
क्लिक करा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप
नागरिकांसोबत संवाद साधून विरोध कमी करा अशा सूचना दिल्यात. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा तयार करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा संवर्धन राखीव क्षेत्राचा सादर केलेल्या प्रस्ताव अतिशय त्रोटक आहे. २११ चौरस किलो मीटर परिसरात हे क्षेत्र असावे अशी मागणी राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांनी बैठकीत केली.
मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याच्या सूचना दिल्या असून पुढील बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. राज्य सर्प आणि स्पायडर याशिवाय इतरही सूचना आहेत. त्याचा निर्णय आठ दिवसात प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन मंत्री आणि इतर सदस्यासोबत बैठक घेऊन घेण्यात येईल असे स्पष्ट केले.
जाणून घ्या - नागपुर पदवीधर निवडणूक: पराभव नक्की कोणाचा? भाजपचा की संदीप जोशींचा?
मुनिया संवर्धन क्षेत्राबद्दल पुढील बैठकीत चर्चा होणार आहे. कॅम्पामधील २० कोटी रुपये संवर्धन राखीव व्यवस्थापनासाठी खर्च करण्यालाही मान्यता देण्यात आली. बैठकीला वनमंत्री संजय राठोड, वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रधान वन सचिव मिलिन्द म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. एन. रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे, यादव तरटे पाटील, कुंदन हाते आदी उपस्थित होते.
नवीन संवर्धन राखीव
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील सज्जनगड, गगनबावडा, बहादुरगड, विशालगड, पन्हाळगड तर सातारा जिल्ह्यातील जोर-जांभळी, मायणी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली-दोडामार्ग
संपादन - अथर्व महांकाळ