गोंदिया मेडिकल कॉलेजची मान्यताच धोक्‍यात

medicle
medicle

नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीचे प्रवेश दरवर्षी हाउसफुल्ल होतात. 2015 मध्ये गोंदिया जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यात आले. मागील पाच वर्षांत अपुरा कर्मचारीवर्ग, वैद्यकीय शिक्षकांची कमतरता, पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने येथील मेडिकल कॉलेजची मान्यता धोक्‍यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तसे पत्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) वैद्यकीय महाविद्यालयाला पाठवले.

सविस्तर वाचा - शू $$$ शांतता... कॉपी सुरू आहे
 
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना "एमसीआय'द्वारे झालेल्या निरीक्षणात वैद्यकीय शिक्षकांच्या रिक्त पदांसह पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने मान्यता देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, न्यायालयात प्रकरण गेल्यामुळे येथील त्रुटी दूर करण्याचे निर्देश देत एमसीआयने गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक आणि वैद्यकीय सचिव यांनी न्यायालयात गोंदिया मेडिकल कॉलेजमधील त्रुटी दूर करण्यासंदर्भात शपथपत्र दिले होते. पाच वर्षे लोटल्यानंतरही वैद्यकीय शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सोयी-सुविधांचा अभाव आहे. यामुळे गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून खरमरीत पत्र लिहून येथील दयनीय अवस्थेची जाणीव करून दिली. पाच वर्षांपूर्वी एमसीआयच्या टीमने केलेल्या निरीक्षणात अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या होत्या. त्या आजही कायम असल्याने येथील प्रवेश धोक्‍यात येण्याची नामुष्की गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयावर ओढावली आहे.

संचालक, सचिवांचे दुर्लक्ष
गोंदिया येथील काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून "एमसीआय'ने येथील दयनीय अवस्थेची जाणीव वारंवार करून दिली. न्यायालयानेही येथील दुरावस्थेबाबत कान टोचले होते. वेळोवेळी इशारा देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने या बाबींकडे अक्षम्य डोळेझाक केली. त्यामुळे आज ही वेळ आल्याचे लोकप्रतिनिधी सांगतात. या कॉलेजची मान्यता धोक्‍यात आल्यास 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्‍यात येतील. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विरोधात गोंदियातील लोकप्रतिनिधींनी रोष व्यक्त केला. यासंदर्भात वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com