सावकाश भरा आयुर्विम्याचा हप्ता; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 15 एपिलपर्यंत मुदतवाढ

Life Insurance Company issues extension up to 15 April
Life Insurance Company issues extension up to 15 April

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाला आहे. अशा स्थितीत विमा घेतलेल्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आयुर्विमा कंपनीने मार्चमधील विमा प्रीमियमला 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या अतिरिक्त कालावधीत विलंब शुल्क आकारले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयाने विमा घेतलेल्या देशभरातील कोट्यवधी विमाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय टपाल आयविमा महासंचालनाने विमा भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यत मुदतवाढ दिली आहे. 

लॉकडाऊनच्या काळात देखील अत्यावश्‍यक सेवा म्हणून टपाल कार्यालये सुरू आहेत. मात्र, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प असल्याने ग्राहकांना टपाल आयुर्विमा, ग्रामीण टपाल आयुर्विम्याचा प्रिमियम भरण्यासाठी टपाल कार्यालयात पोहोचण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीची दखल घेत दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाने ग्राहकांच्या सोयीसाठी प्रीमियम देयकाचा कालावधी 15 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

विमाधारकांना विमा भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशा सूचना विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) विमा कंपन्यांना दिल्या होत्या. त्यानंतर विमा बाजारपेठेत सर्वाधिक हिस्सा असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने विमा प्रीमियम भरण्यास मुदतवाढ दिली. इतर खासगी कंपन्यांनी प्रीमियम भरणा करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त कालावधी दिला आहे. पोर्टलवरील नोंदणीकृत ग्राहकांना पोर्टलचा वापर करून प्रीमियम भरता येईल, असे टपाल आयुर्विमा संचालनालयाने म्हटले आहे. 

तेरा लाख विमा धारकांना फायदा

जवळपास 42 लाख नागरिकांनी टपाल आयुर्विमा घेतला आहे. त्यातील 29 लाख ग्राहकांनी मार्च महिन्याचा प्रीमियम भरला असल्याचा दावा संचनालयाने केला आहे. लॉकडाऊनमुळे चालू महिन्यात प्रिमियम भरणे शक्‍य झाले नाही, अशा अंदाजे सुमारे तेरा लाख विमा धारकांना टपाल विभागाच्या मुदत वाढीचा फायदा मिळणार आहे. टपाल आयुर्विमा (PIL) घेतलेले पाच लाख पन्नास हजार ग्राहक आहेत. तर सुमारे सात लाख पन्नास हजार नागरिकांनी ग्रामीण टपाल आयुर्विमा (RPIL) घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com