‘आरटीपीसीआर’च्या नावावर मध्यप्रदेश सीमेवर लूट; नागरिक त्रस्त

‘आरटीपीसीआर’च्या नावावर मध्यप्रदेश सीमेवर लूट; नागरिक त्रस्त

नागपूर : परराज्यात ये-जा करण्यासंदर्भात महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेश सरकारने निर्बंध शिथिल (Maharashtra and Madhya Pradesh governments relax restrictions) केले आहेत. परंतु, छिंदवाडा रोडवरील मध्यप्रदेश सीमेवर महाराष्ट्रातून लोधीखेडा, सौंसर, रामाकोनाला जाणारे नागरिक तसेच पचमढीला जाणाऱ्या पर्यटकांची मध्यप्रदेश पोलिसांकडून आरटीपीसीआर चाचणीच्या नावावर आर्थिक लूट (Financial robbery in the name of RTPCR test) केली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून जाणाऱ्यांनाच अडवून छळ सुरू आहे. मात्र, मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्यांची साधी चौकशीही केली जात नाही. (Looting-of-civilians-at-Madhya-Pradesh-border-in-the-name-of-RTPCR)

कोरोनामुळे परराज्यातील प्रवाशांना राज्यांत प्रवेशबंदी होती. महाराष्ट्र सरकारप्रमाणे मध्यप्रदेश सरकारनेही सीमाबंदी केली होती. परंतु, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारपाठोपाठ मध्यप्रदेश सरकारनेही प्रवेशबंदी उठवली असून त्याबाबत आदेशही काढले. परंतु, छिंदवाडा रोडवर केळवदनंतर असलेल्या मध्यप्रदेश सीमेवर मध्यप्रदेश पोलिसांकडून नागरिकांची अडवणूक केली जात आहे. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मागितला जात आहे.

‘आरटीपीसीआर’च्या नावावर मध्यप्रदेश सीमेवर लूट; नागरिक त्रस्त
शीतलचे आलिशान कारचे स्वप्न भंगले; डॉक्टर दाम्पत्य खंडणी प्रकरण

विशेष म्हणजे चिरीमिरी दिल्यानंतर या अहवालाचा मध्यप्रदेश पोलिसांना विसर पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सावनेर, केळवद, धापेवाडा, कळमेश्वर, खापा या गावातून मध्यप्रदेशातील रेमंड बोरगाव येथे नोकरी करणाऱ्या अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय सीमेवरील अनेक गावातील नागरिकांना मध्यप्रदेशात जवळच असलेल्या गावांत शेतीविषयक वस्तू, बियाणे खरेदीला जावे लागते. परंतु, त्यांनाही मध्यप्रदेश पोलिसांचा जाच सहन करावा लागत आहे. परिणामी मध्यप्रदेश पोलिसांबाबत महाराष्ट्रातील अनेक गावातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

कोरोना नियंत्रित झाल्यामुळे नागपुरातील अनेकांनीही पचमढीसारख्या ठिकाणी फिरण्याचा बेत आखला. पचमढीला जाणाऱ्या या पर्यटकांकडून मोठी वसुली केली जात असल्याचे नागपुरातील दिलीप पागे यांनी सांगितले. विशेष म्हणजे याच चेक पोस्टवरून मध्यप्रदेशातील नागरिक महाराष्ट्रात येतात. त्यांना मात्र बिनधास्त सोडले जात आहे. याशिवाय सिवनी मार्गावरील चेक पोस्टवर कुठलाही त्रास नसल्याचे पागे म्हणाले. खापा-सिंदेवाही मार्गेही मध्यप्रदेशात जाताना लहान नाका आहे. तिथेही पैशाची मागणी केली जात असल्याचे समजते. त्यामुळे या भागातील नागरिकही संतप्त झाले आहेत.

‘आरटीपीसीआर’च्या नावावर मध्यप्रदेश सीमेवर लूट; नागरिक त्रस्त
सहकारी तरुणीशी वैज्ञानिकाचे अश्‍लील चाळे

महाराष्ट्र पोलिसांचे मौन

मध्यप्रदेश पोलिसांकडून महाराष्ट्रातील नागरिकांची लूट होत आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकार आणि पोलिस मात्र झोपा काढत आहे. मध्यप्रदेश बॉर्डरवर महाराष्ट्र पोलिसांनाही कर्तव्य बजावण्यासाठी एक नाका असावा, अशी मागणी दिलीप पागे यांनी केली आहे.

(Looting-of-civilians-at-Madhya-Pradesh-border-in-the-name-of-RTPCR)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com