

Maharashtra Loan Recovery Case Registrar Meets Woman Facing Finance Company Harassment Over Pending Loan Installments
sakal
हिंगोली : वाघजाळी (ता. सेनगाव) येथील महिला कर्जदारांनी फायनान्स कंपन्यांचे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी चक्क घर विक्रीस काढल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सेनगाव येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक अक्षय गुठ्ठे यांनी पथकासह शुक्रवारी (ता. ३०) वाघजाळी गाठले. कर्जदारांशी संवाद साधून त्यांनी प्रकाराची माहिती घेतली.