Maharashtra HSC Exam Mass Copy Case
esakal
नागपूर : राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. मात्र, बारावीच्या परीक्षेदरम्यान तीन पेपर फुटल्याची घटना समोर आली असताना, गोंदिया आणि वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यात ‘जीवशास्त्र’ या पेपरदरम्यान ‘मास कॉपी’ केल्याचे २४३ विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस (Maharashtra HSC mass copying case 2026) आला. याप्रकरणी या सर्वच विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आला आहे. या सर्वच विद्यार्थ्यांवर अनुशासनात्मक कारवाई केल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.