विधानपरिषद निवडणूक २०२१ : नागपूरची जागा बिनविरोध नाही, बावनकुळे विरुद्ध भोयर रंगणार सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Bhoyar and
Chandrashekhar Bawankule

विधानपरिषद : नागपूरची जागा बिनविरोध नाही, बावनकुळे विरुद्ध भोयर सामना

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांसाठी (Maharashtra Legislative Council Election 2021) कोल्हापूर, धुळे-नंदुरबार आणि मुंबईच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. पण, नागपुरात मात्र विधानपरिषदेची (Nagpur) निवडणूक होणार आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bawankule) आणि काँग्रेस रविंद्र भोयर (Congress Ravindra Bhoyar) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा: विधानपरिषद : या दोन जागांसाठी भाजपने सतेज पाटलांसाठी कोल्हापूर सोडलं!

भाजपने धुळे-नंदुरबार आणि मुंबईच्या एका जागेसाठी कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली आहे. तसेच मुंबईत एका जागेवर भाजप बिनविरोध आहे, तर एका जागेवर शिवसेना बिनविरोध आहे. नागपूरची जागा सुरुवातीला बिनविरोध होणार आहे, असं बोललं जात होतं. मात्र, आता हा सामना रंगणार आहे. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुनर्वसन करत त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली, तर काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत भाजपमधून आयात केलेल्या रविंद्र भोयर यांना उमेदवारी दिली आहे. भोयर यांचा उमेदवारी अर्ज कायम अजून ते बावनकुळे यांच्याविरोधात लढणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे.

नागपुरात भाजपकडे अधिक मत आहेत. मात्र, काँग्रेसने भाजपमधील ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र भोयर यांना फोडले आणि त्यांनाच उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपचे अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत, असा दावा भोयर यांनी केला आहे. तसेच भाजपचे नगरसेवक देखील पर्यटनासाठी गेल्याचे बोलले जात आहे. भाजपला घोडेबाजाराची भीती असल्यानं नगरसेवकांना पर्यटनासाठी पाठविल्याचे जानकार सांगतात. आता निवडणूक बिनविरोध न होता भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे या निवडणूक आणखी किती चुरशीची होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

loading image
go to top