Maharashtra Winter Session
esakal
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवासात उत्सवी सजावट करण्यात आली असून राज्यभरातून येणाऱ्या आमदारांचे स्वागत भव्य व आकर्षक पद्धतीने करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आमदार निवासातील प्रवेशद्वारापासून संपूर्ण आवारापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. गेरू, झेंडू, गुलाब, लिली, जेरबेरा यांसारख्या फुलांच्या सुंदर रांगोळ्यांनी परिसर सुशोभित करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारावर खास तयार केलेल्या पुष्प कमानींमुळे स्वागताचा माहोल झाला आहे. संपूर्ण परिसरात लावलेल्या ताज्या फुलांच्या माळांनी वातावरण अधिक प्रसन्न केले आहे.