

नागपूर : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप -महायुती विजयी होईल आणि अनेक ठिकाणी महायुतीचे महापौर असतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल, असा दावा त्यांनी केला.