

Mai Lives On Through Her Work: Mamata Tai’s Heartfelt Address in Buldhana
Sakal
बुलडाणा: आपल्या सगळ्यांना सुरक्षित घर आहेत, मात्र अनाथ मुलांना घराची किंमत कळली पाहिजे, घरासारखी माया मिळाली पाहिजे यासाठी माईने सुरू केलेलं बालनिकेतन आम्ही सांभाळत आहोत. आई होती, आई आहे , तिच्या कार्यातून ती सदैव राहील अश्या शब्दात माईंच्या कार्याचा केला उलगडा पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी केला. ''तू आहेस ना'' या जिव्हाळा परिवार बुलडाणा यांच्या वतीने गोवर्धन हॉलमध्ये आयोजित मुक्त संवादामध्ये ममता सपकाळ यांनी बुलडाणेकर रसिकांशी संवाद साधला.