esakal | जीव वाचविण्यासाठी घाबरून पळाला, पण नदीत पडला अन् झाला मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

मृत कैलाश

जीव वाचविण्यासाठी घाबरून पळाला, पण नदीत पडला अन् झाला मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मौदा (जि. नागपूर) : पोळ्याच्या पाडव्याला ग्रामीण भागातील लोक दारू पिऊन जुगार खेळतात. यातून कधी वाद निर्माण होतात. हाणामारी होते व कधीकधी जिवावर बेतते. अशाच जुगाराच्या वादातून आणि वाहनाने दिलेल्या धक्क्यामुळे आपल्याला मारहाण होईल, या भीतीपोटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरुण पळून गेला. मात्र, पळताना आजनगावकडे जाणाऱ्या सांड नदीत पडला व वाहून गेला. ही घटना मौदा (Mouda nagpur) तालुक्यात घडली.

हेही वाचा: खासदार तडस यांच्या कौटुंबिक वादात मोठा ट्विस्ट, मुलगा-सुनेचं वैदीक पद्धतीनं लग्न

गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कैलास वाकडे (वय ३३, राहणार धानला) असे पुरात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. तान्ह्या पोळ्याच्यानिमित्त गावात जुगार सुरू असताना गावातील एका व्यक्तीसोबत जुगारामध्ये कैलासचा एका जणाशी वाद झाला. वाद झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक येऊन त्यांनी कैलासला बेदम मारहाण केली. कैलास रागात घरी असलेले स्वतःचे चारचाकी वाहन घेऊन गेला आणि घाईघाईत त्याच्या वाहनाचा मारहाण करणाऱ्या व्यक्तीला धक्का लागला. धक्का लागलेली व्यक्ती खाली पडली. त्यामुळे परत मारहाण होईल म्हणून कैलास गावातून घाईघाईने बाहेर पळत असताना आजनगाव मार्गाने पळाला. सांड नदीच्या पुलावरुन पूर असल्याने कैलासने चारचाकी निघणार नाही म्हणून पलीकडे पोहत जाण्याकरिता पाण्यात उडी घेतली व नाला पार करु लागला. तो वाहत्या धारेला लागला व त्यात तो वाहून गेला. ही घटना गावातीलच एक दुसऱ्या व्यक्तीने बघितली असता त्यांनी कैलासच्या शेजाऱ्याला फोन करून घडलेली हकिगत सांगितली. कैलासचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर आढळला. कैलासच्या मृत्यूनंतर पत्नी रजनी, मुलगा रोहित, मुलगी श्रावणी, आई तुळसाबाई असा मोठा परिवार आहे.

गावात कडक पोलिस बंदोबस्त

घटनेला जातीय रंग येऊन नये व गावातील शांतता, सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, म्हणून धानला येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून काही पोलिस हे बोरगाव या गावी थांबवण्यात आले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह घरी आणण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मुक्तार बागवान, मौदा तहसीलदार मलिक विराणी, उपपोलिस अधीक्षक, सहाय्यक उपपोलिस पोलिस अधिकारी, मौदा पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे व इतर पोलिस उपस्थित होते

loading image
go to top