Man is no more due to shot of Toy gun in Nagpur Latest News
Man is no more due to shot of Toy gun in Nagpur Latest News

मित्राला दाखवण्यासाठी छर्ऱ्याच्या बंदुकीनं धरला नेम अन् पुढे घडला मृत्यूचा भयंकर थरार 

Published on

नागपूर : आजपर्यंत अनेक गुन्हांच्या घटना नागपुरात घडल्या आहेत. यामध्ये कधी सूडबुद्धीतून तर कधी वादातून हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता आम्ही जी घटना तुम्हाला सांगणार आहोत त्या घटनेमुळे तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. नागपूरच्या दाभा या परिसरातील ही घटना आहे. 

छºर्याच्या बंदुकीद्वारा एकाचा मृत्यू झाला. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत दाभा चौक परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. लोकेश जंगलुजी गजभिये (वय ४२, रा. दाभा चौक) असे मृताचे नाव आहे. 

त्याचं झालं असं की, पंकज पाणी (वय ४०, रा. दाभा चौक) यानं छºर्याची बंदूक विकत घेतली. ती बंदूक आपला मित्र लोकेश याला दाखवण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. त्यावेळी लोकेश हा बंदूक चालते कशी हे दाखवण्याची विनंती करीत होता. पण पुढे काय घडणार याची कल्पना कुणालाच नव्हती. 

पंकज हा बंदुकीत छर्रा भरायला गेला. पण, पूर्वीचाच बंदुकीत छर्रा फसला असल्याने दुसरा छर्रा जात नव्हता. पंकजला वाटले की बंदूक बिघडली. छर्रा जात नसल्याने केवळ आवाज ऐकवण्यासाठी त्याने बंदूक लोकेशच्या दिशेने ताणली व घोडा दाबला असता फसलेला छर्रा निघून थेट लोकेशच्या डाव्या डोळयातून डोक्यात घुसला. 

यामुळे पंकज गजभिये जखमी होऊन जमीनीवर कोसळला. पंकजले मित्राला लगेच रुग्णालयात दाखल केले व पोलिसांना भ्रमणध्वनी करून घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी तपासून लोकेशला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com