

Manoj Jarange Backs Bachchu Kadu Farmers Mega Protest in Nagpur
Esakal
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी नागपुरात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राजू शेट्टी यांच्यासह इतर नेत्यांचाही पाठिंबा आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हेसुद्धा नागपूरमधील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले आहेत. बच्चू कडू आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असून त्यात तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारचा डाव प्रतिडावाने उधळून टाका असंही जरांगे पाटील म्हणाले.