महापौर लढतील विधानसभेची निवडणूक? वाढदिवशी केली ही घोषणा, वाचा

Mayor Sandip Joshi declared retired from the Municipal Corporation
Mayor Sandip Joshi declared retired from the Municipal Corporation

नागपूर : महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी वाढदिवशी यापुढे महापालिकेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा करून भाजप कार्यकर्त्यांसह सर्व चाहत्यांना धक्का दिला. चार निवडणुकांपासून आपण सतत लढत आहोत. आता कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

जोशी यांनी वाढदिवसानिमित्त फेसबुक लाईव्हवर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. त्यात त्यांनी उपरोक्त घोषणा केली. जोशी महापालिकेचे सलग दोन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तत्पूर्वी, जलप्रदाय समितीचे सभापतींसह विविध पदांवर त्यांनी काम केले. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुंबईतून लढणार अशी जोरदार चर्चा यंदाच्या विधानसभेत होती. मुंबईत व्यस्त असल्याने फडणवीस यांनी पालक म्हणून जोशी यांच्यावरच जबाबदारी सोपविली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे वारसदार म्हणून जोशी यांचे नाव आघाडीवर होते. तत्पूर्वी, पद्‍वीधर मतदारसंघासाठीसुद्दा त्यांच्याच नावाची सुरुवातील चर्चा होती. भाजपने त्यांना मतदान नोंदणीची जबाबदारीसुद्धा सोपविली होती. महापालिकेतून निवृत्ती घेऊन जोशी आता विधानसभेची तयारी करतील अशी जोरदार चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार
सलग चार निवडणूक लढल्या. आता महापालिकेतील सर्वोच्च महापौरपद भूषविल्यानंतर पुन्हा नगरसेवक म्हणून निवडणूक लढणे मनाला पटत नाही. आपणच लढत राहिलो तर कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार हासुद्धा प्रश्न आहेच. त्यामुळे यापुढची महापालिकेची निवडणूक लढायची नाही असे ठरविले.
- संदीप जोशी, महापौर
 

 संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com