नागपूर : मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली; बर्ड फ्लूचे संकट

नियंत्रणाचे नियोजनच नाही; ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे बर्ड फ्लू चा शिरकाव

minister order Bird flu crisis Not just control planning
minister order Bird flu crisis Not just control planningsakal

नागपूर : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे बर्ड फ्लू चा शिरकाव झाला आहे. राज्यातील इतर भागातही त्याचा धोका निर्माण होता कामा नये म्हणून पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी खबरदारीचे उपाय करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना दिले. मात्र, पशुसंवर्धन मंत्र्याच्या आदेशाला जिल्हा परिषद प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे भविष्यात बर्ड फ्लू चे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील यंत्रणा पशुधन वाटपात व्यस्त आहे. विभागप्रमुख नसल्याने कोणतेही उपाययोजना करण्यात आलेली नाही. निवृत्त अधिकाऱ्याच्या सल्ल्यावर विभागाचा कारभार सुरू आहे. विभागाच्या प्रभारी अधिकारी डॉ. शीला बनकर यांना कोरोनाची लागण झाल्यमुळे त्या सुटीवर आहेत. कुही पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. कविता मोरे यांच्याकडे सध्या पदभार देण्यात आला. त्या पदभार स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे सध्या विभाग वाऱ्यावर आहे.

मंत्री केदार यांनी सर्व पोल्ट्रीफार्मला भेटी देऊन प्राथमिक तपासणीनंतर मालकांना खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले. मात्र त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. काहींनी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला. विभागाचे सभापती तापेश्वर वैद्य यांना विभागाला खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. परंतु त्याकडेही काणाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.

वारंगात आढळला होता ब्लर्ड फ्लू

बुटीबोरीलगतच्या वारंगा येथील एका फार्म हाउसमधील कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले होते. जानेवारी २०२१ ला प्रकार घडला होता. त्यानंतर तत्कालीन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. युवराज केने यांच्यासह विभागाच्या पथकाने तडकाफडकी वारंगा येथे जाऊन रात्रभर कारवाई करीत साडेचारशेवर कोंबड्या नष्ट केल्या होत्या. कळमेश्वर, मौदा तालुक्यातही कोंबड्यांना हा आजार दिसून आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com